* पाकिस्तानींना 48 तासांत भारत सोडण्याचे आदेश
* पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीतून पाकची कोंडी
नवी दिल्ली / प्रतिनिधी :- पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी सीसीएस म्हणजे कॅबिनेट सुरक्षा सेक्युरिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत काश्मीरमधील दहशवाद आणि पाकिस्तान या विषयावर प्रामुख्याने चर्चा झाली असून 5 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर देखील या बैठकीला हजर होते. या बैठकीत अटारी-वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंधू जल करारावर स्थगिती देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेला भारतातील व्हिसा रद्द करण्यात येत आहे. तसेच, भारतातील पाकिस्तान दुतावासाच्या अनुषंगाने देखील महत्त्वाचा निर्णय या बैठकीत झाला आहे. दरम्यान, पाकिस्तानची व्यापाराच्या दृष्टीने कोंडी करण्याची रणनीती भारताने आखली असून आजच्या बैठकीतील निर्णयाचा दूरगामी परिणाम भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर होणार आहे.


Social Plugin