* व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल
नवी मुंबई / प्रतिनिधी :- नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) बसमधून प्रवास करणाऱ्या तरुण-तरुणीने बसमधील पाठीमागील सीटवर चक्क अश्लील रासलीला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बाजुने जाणाऱ्या दुसऱ्या बसमधील प्रवाशाने या प्रकाराचा व्हिडीओ काढून तो व्हायरल केला. त्यानंतर सदर किळसवाणा प्रकार उघडकीस आला. एनएमएमटी प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन बसमध्ये अश्लिल चाळे करणाऱ्या तरुण-तरुणींवर कारवाई करण्यासाठी कामोठे पोलिसांना पत्र दिले आहे. त्यानुसार कामोठे पोलिसांनी अश्लिल चाळे करणाऱ्या तरुण-तरुणीचा शोध सुरु केला आहे.
'एनएमएमटी'ची मार्ग क्रमांक 73 वरील एसी बस पनवेल रेल्वे स्थानक ते आयजीपीएल या मार्गावर फेऱ्या मारत होती. यावेळी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास एनएमएमटी बस पनवेल रेल्वे स्थानकातून आयजीपीएलकडे जाण्यास निघाली होती. या बसमध्ये तुरळक प्रवासी असल्याने ते बसमध्ये पुढील बाजुच्या सिटवर बसले होते. पाठीमागील सीटवर फक्त तरुण-तरुणी बसले होते. बसमधील वाहकाने सर्व प्रवाशांचे तिकीट काढल्यानंतर ते देखील पुढे जाऊन बसले. सदर बस कळंबोली सर्कलच्या अलिकडे सिग्नलवर थांबली होती. याचवेळी पाठीमागील सीटवर कुणीही प्रवासी नसल्याची संधी साधून पाठीमागील सदर तरुणाने त्याच्यासोबत असलेल्या तरुणीचे अर्धवट कपडे काढुन बसमध्येच अश्लिल चाळे सुरु केले. सदर प्रकार बाजुने जाणाऱ्या दुसऱ्या बसमधील प्रवाशाला निदर्शनास आल्याने त्याने आपल्या मोबाईलद्वारे एनएमएमटी बसमध्ये सुरु असलेल्या तरुण-तरुणीच्या अश्लिल चाळ्याचे रेकॉर्डींग केले. त्यानंतर त्याने सदरचा व्हिडीओ व्हायरल केला.
व्हायरल झालेला व्हिडीओ एनएमएमटी अधिकारी तसेच नवी मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांची एकच तारांबळ उडाली. एनएमएमटी प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन कामोठे पोलिसांना पत्र पाठवले आहे. तसेच एनएमएमटी बसमधील वायरल झालेल्या व्हिडीओमुळे नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाची बदनामी होत असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
तसेच या प्रकाराची दखल घेऊन बसमध्ये अश्लिल चाळे करणाऱ्या तरुण-तरुणीवर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती केली आहे. बसमध्ये अश्लिल चाळे करणाऱ्या सदर तरुण-तरुणी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती कामोठे पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी दिली. तसेच या तरुण-तरुणींचा शोध घेण्यात येत असल्याचेही बिडवे यांनी सांगितले.
व्हायरल व्हिडिओनंतर एसी बसमधील कंडक्टरने कपलविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी कपलविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 296 अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दाखल केलेल्या तक्रारीनुसार, कपलला 3 महिन्यांपर्यंत तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. किंवा त्यांना 1000 रूपयांपर्यंत दंड भरावा लागेल. या दोन्हीपैकी एक शिक्षा त्यांना होऊ शकते.
नवी मुंबईतील एनएमएमटीच्या बसमध्ये एक प्रेमीयुगुल नको ते कृत्य करताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यांचा 22 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कंडक्टरविरोधात कारवाई सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. प्रेमी युगुल नको ते कृत्य करत असताना कंडक्टरांचे लक्ष नेमके कुठे होते ? त्यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कारवाई होण्याची शक्यता आहे.


Social Plugin