Type Here to Get Search Results !

भाजपा खालापूर तालुका अध्यक्षपदी सनी यादव

खालापूर / प्रतिनिधी :- भारतीय जनता पक्षाचे संघटन पर्व सध्या सुरू आहे. त्याला अनुसरून पक्षाच्या खालापूर तालुका पूर्व मंडल अध्यक्षपदी सनी यादव यांची नियुक्ती सोमवार, 21 एप्रिल रोजी करण्यात आली. 

सनी यादव हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांनी या पूर्वी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केले होते. भाजपच्या खालापूर तालुका अध्यक्षपदी निवडीसाठी महड येथे भाजपा कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी पक्षाच्या धोरणानुसार सूचक खालापूर शहर अध्यक्ष दिपक जगताप व अनुमोदक स्वाली बूथ अध्यक्ष जयेंद्र पाटील यांच्या अनुमतीने व निवडणूक प्रमुख नितीन कांदलगावकर, जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत सनी यादव यांची खालापूर तालुका मंडल अध्यक्ष म्हणून निवड झाली. निवडीनंतर सनी यादव यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहचविणे आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सक्रियपणे आवाज उठविणे, हेच पक्षाचे मुख्य ध्येय राहील असे सनी यादव यांनी मनोगतात सांगितले. 

यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस दिपक बेहरे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, खालापूर निवडणूक प्रमुख नितीन कांदनगावकर, अध्यात्मिक आघाडी रायगड जिल्हा संयोजक काशिनाथ पारठे, रायगड जिल्हा किसान मोर्चा संयोजक अतुल बडगुजर, महिला मोर्चा खालापूर तालुका अध्यक्ष सुजाता दळवी, खालापूर तालुका युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नागेश पाटील, खालापूर तालुका सरचिटणीस रविंद्र पाटील, हरिभाऊ जाधव, जगदीश आगिवले, विकास रसाळ, खालापूर शहर अध्यक्ष दिपक जगताप, संजय देशमुख, रवी मोरे, प्रवीण पाटील, हेमंत पाटील, वत्सलाताई मोरे, राश्वेताताई मनवे, राखीताई गणेशकर, निकिता हेलांडे, सुप्रिया तटकरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement