मुंबई / प्रतिनिधी :- छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचलित प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाच्या इशिता रेवाळेला जिम्नॅस्टिक्स क्रिडा प्रकारात आणि याश्वी शाहला आर्टिस्टिक रोलर स्केटिंग या क्रिडा प्रकारात महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च क्रिडा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील बालेवाडी क्रिडा संकुलात प्रदान करण्यात आला.
प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू, सचिव डॉं. मोहन राणे, जिम्नॅस्टिक्स विभाग प्रमुख निलम बाबरदेसाई, प्रशिक्षक विशाल कटकदौंड आणि आर्टिस्टिक रोलर स्केटिंग प्रशिक्षक आदेश सिंह यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.


Social Plugin