Type Here to Get Search Results !

मरण सोपं...

रण सोपं आहे जगणं खूप कठीण आहे,

दोन मिनिट न बोलणारा माणूस 

आज खूप खूप बोलून रडत आहे।


अपेक्षा नाही कधी शुभेच्छाची,

आज आहेत भेटी फक्त पुष्पगुच्छाची।

हात द्यायला कोण तयार नव्हतं,

आज लोकांसोबत घेऊन चालत आहे।


चांगल्या व्यक्तीवर शंका घेतात,

विश्वास वाईट व्यक्तीवर।

चर्चा दुसऱ्याची करायला 

जमतात सगळे रस्त्यावर।


खरंच हे कौतुक आहे का, आज असा प्रश्न पडतो,

आजच्या साठी एवढं कौतुक साठवून कुठे ठेवतो।

मरण एवढं चांगल आहे, म्हणून का ?

जगण्याची शिक्षा माणसाला आहे। 

                                             

- मानसी कांबळे

संपादक - माय कोकण न्युज 24

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement