* ठाकरे गटाला मोठा धक्का ; युवासेना समन्वयक प्रशांत खांडेकर, सरपंच शिल्पा खांडेकर व शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
कर्जत / फिरोज पिंजारी :- कर्जत-खालापूर तालुक्यात आज मोठा राजकीय भूकंप झाला आहे. ठाकरे गटाला मोठा झटका देत युवासेना रायगड समन्वयक प्रशांत खांडेकर, सरपंच शिल्पा खांडेकर व शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत (शिंदे गट) जंगी प्रवेश केला.
हा भव्य पक्षप्रवेश सोहळा कर्जत येथील बाळासाहेब भवन येथे उत्साहात पार पडला. भगवे फडकले, घोषणांनी परिसर दुमदुमला आणि तालुक्यातील राजकीय समीकरणे एका क्षणात बदलून गेली.
* ठाकरे गटाचा गड कोलमडला - शिंदे गटात ‘मोठी एन्ट्री’ :- जामरुंग व नावंढे परिसरातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले. विशेष म्हणजे प्रशांत खांडेकर व सरपंच शिल्पा खांडेकर यांच्या प्रवेशामुळे खालापूर तालुक्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड मानली जात आहे.
* आ. थोरवे यांचे नेतृत्व बळकट :- आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, शिवसेनेत नवा-जुना भेद नाही. काम करा, मान मिळवा ही आमची संस्कृती आहे. त्यांनी पुढे सांगितले की, हा प्रवेश हा केवळ पक्ष प्रवेश नाही, तर कर्जत-खालापूरात शिवसेनेच्या वर्चस्वाची सुरुवात आहे.
* पक्षप्रवेशामुळे तालुक्याचे राजकारण गरम :- या प्रवेशामुळे स्थानिक व प्रदेश पातळीवर उत्सुकता वाढली आहे. राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, कर्जत-खालापूरमध्ये शिवसेनेचा झेंडा आता उंच फडकणार. ठाकरे गटासाठी ही मोठी राजकीय धडक आहे.
जामरुंग ग्रामपंचायतमधील प्रशांत खांडेकर (समन्वयक युवासेना, रायगड), शिल्पा प्रशांत खांडेकर (सरपंच, जामरुंग), निकिता दुर्गेश खोपडे (उपसरपंच, जामरुंग), मारुती नारायण गायकर (सदस्य), प्रसाद कदम (सदस्य), वसंत वाघमारे (सदस्य), अनंत मेंगाळ (सदस्य), प्रणाल लाले (विभागप्रमुख, युवासेना), जगदीश पिंगळे (शाखाप्रमुख, जामरुंग), राजेश पवार (शाखा अधिकारी, युवासेना खरवई), योगेश तांडेल (मा. सदस्य, शाखाप्रमुख), जगन्नाथ तांडेल, महेश सावंत, बाग्या धुळा, तातू हिंदोळा, सीताराम मेंगाळ, देहू मेंगाळ, उत्तम हिंदोळा, सीताराम बांगारा, गोपीनाथ मेंगाळ, नंद्या मेंगाळ, वाळकु होला, कृष्णा मेंगाळ, यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
जामरुंग वाडी येथील नरेश हिंदोळा, गणेश मेंगाळ, वासुदेव कातोरा, राजू कातोरा, अनंत कातोरा, पांडू कातोरा, प्रभाकर मेंगाळ, नारायण हिंदोळा, रुपेश दुबळे, पांडू सुतक, मंगेश हिंदोळा, रोहित सुतक, यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
ग्रुप ग्रामपंचायत नावंढे येथील नरेश नारायण हडप, विकास नागू हडप, संतोष महादू हडप, योगेश अनंता हडप, भगवान हरिश्चंद्र हडप, सचिन पंढरीनाथ हडप, रमेश नामदेव हडप, ललिता नरेश हडप, साक्षी संतोष हडप, कमल नरेश हडप, अरुणा भगवान हडप, सपना योगेश हडप, विकास नागू हडप, श्लोक सुधीर नलावडे, आर्यन सुनील नलावडे, रुपेश सुनील चव्हाण, निलेश जयवंत सुर्वे, भरत शंकर हडप, प्रशांत शत्रुघ्न हडप, यांनी शिवसेना पक्ष प्रवेश केला.
नावंढे वाडी येथील योगेश पवार, भीम पवार, शंकर वाघमारे, अविनाश पवार, प्रदीप वाघमारे, शुभम वाघमारे, अभिषेक पवार, शेखर वाघमारे, संदीप पवार, अजय पवार, संदेश हिल्म, राहुल वाघमारे, ओमकार हिल्म, मनोज वाघमारे, ओम जाधव, सुरेश वाघमारे, रोहित वाघमारे, प्रफुल वाघमारे, अजय वाघमारे, पांडुरंग पवार, राहुल पवार, अनिल पवार, शाम वाघमारे, विशाल वाघमारे, बारकू हिल्म, सतीश हिल्म, सीताराम वाघमारे, गोकुळ वाघमारे, प्रवेश वाघमारे, यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
खरवई वाडी येथील वसंत गोविंद वाघमारे (ग्रुप ग्रामपंचायत सदस्य), संजय दत्ता वाघमारे, राजन बाळू वाघमारे, जेनेश मंगेश वाघमारे, भीम जानू वाघमारे, प्रतीक राम वाघमारे, प्रकाश किसान वाघमारे, पवन विजय वाघमारे, अक्षय दत्ता वाघमारे, यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
या पक्षप्रवेश कार्यक्रमाप्रसंगी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख प्रसाद थोरवे, खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील, युवासेना उपजिल्हा प्रमुख निखिल पाटील, युवासेना विधानसभा अध्यक्ष रोहित विचारे, कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, युवासेना जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष अक्षय दिसले, गोरठण ग्रामपंचायत विभाग प्रमुख महेश पाटील, बीड ग्रामपंचायत विभाग प्रमुख राकेश सुखदरे, चंदन भारती, विष्णू ठोंबरे, भालचंद कदम, अक्षय काशीद, समीर हडप, वासुदेव भोसले, सुयश भोसले, रामदास तांडेल, चैतन्य तांडेल, योगेश खांडेकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Social Plugin