Type Here to Get Search Results !

नगर परिषद - नगर पंचायत निवडणुका 2025 : रायगड जिल्ह्यात कडक बंदी आदेश जारी

* भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 नुसार 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत निर्बंध ; 5 जणांपेक्षा जास्त जमाव, प्रचार, लाउडस्पीकर, बुथ, वाहने यांना मनाई

रायगड / प्रतिनिधी :- राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नगर परिषद / नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2025 अनुषंगाने 2 डिसेंबर 2025 रोजी रायगड जिल्ह्यात मतदान होणार आहे. मतदान शांततेत, स्वच्छ व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 नुसार कडक बंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश 30 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 ते 2 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 पर्यंत अंमलात राहणार आहे.


* मतदानपूर्व 48 तास कडक निर्बंध :- मतदान खुल्या, स्वच्छ आणि निष्पक्ष वातावरणात व्हावे यासाठी एकत्रित जमाव व प्रचारावर मनाई, 5 पेक्षा जास्त व्यक्तींचा जमाव मनाई, सार्वजनिक सभा, रॅली, बैठकांना मनाई, घरोघरी जाऊन प्रचार करण्यास मंजुरी, प्रचारासाठी बल्क मेसेजिंग पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.


* बाहेरील कार्यकर्त्यांना प्रवेशबंदी :- मतदान क्षेत्रात जे मतदार नाहीत असे बाहेरील कार्यकर्ते, नेते, प्रचारक मिरवणुकीतील सदस्य यांना नगर परिषद / नगर पंचायत हद्दीत थांबण्यास मनाई करण्यात आली आहे.


* लाउडस्पीकर, मेगाफोन, गोंधळ यावर बंदी :- मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात लाउडस्पीकर, मेगाफोन, ओरडणे, घोषणाबाजी, गोंधळ यास संपूर्ण मनाई करण्यात आली आहे.


* मतदान केंद्र परिसरात मोबाईल, वायरलेसवर निर्बंध :- 100 मीटर परिसरात मोबाईल फोन, वायरलेस, इतर कोणतेही संपर्क साधन (अपवाद : अधिकारी/कर्मचारी/सुरक्षा दल) यांना बंदी घालण्यात आली आहे.


* शस्त्रांवर बंदी :-  मतदान केंद्राच्या 100 मीटरमध्ये कोणालाही शस्त्र नेण्यास मनाई करण्यात आली असून सुरक्षा अधिकारी, SPG/Z+ संरक्षित व्यक्तीस एक शस्त्रधारी सुरक्षा रक्षक (साध्या वेशात) अपवाद आहे.


* मतदान बुथ व वाहनांवरील बंदी :- मतदान केंद्राच्या 200 मीटरमध्ये कोणतेही वाहन नेणे मनाई असून अपवाद अपंग, वृद्ध व आजारी मतदारांची वाहने ही राहतील. 200 मीटर आत निवडणूक बुथला मनाई असून 200 मीटर बाहेर बुथसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी आवश्यक, डी.आर.ओ.ला आगाऊ कळविणे, बुथचा आकार 10X10 पेक्षा कमी, फक्त 1 टेबल + 2 खुर्च्या राहतील.


यासह मतदान केंद्राजवळील पक्ष कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी प्रचार मनाई, मतदारांना दिल्या जाणाऱ्या चिठ्ठ्या पांढऱ्या कागदावर, कोणतेही नाव/चिन्ह नसावे, मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात व्यापार/आस्थापना चालू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.


हा आदेश मोडणाऱ्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 नुसार कठोर कायदेशीर कारवाई होणार आहे, असे कळविण्यात आले आहे.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement