Type Here to Get Search Results !

नगराध्यक्षपदासाठी 7 उमेदवार रिंगणात ; 15 प्रभागांत 31 जागांसाठी चुरस वाढली


* खोपोली नगरपरिषद निवडणूक 2025 : खोपोलीचा अंतिम मुकाबला

* प्रभागनिहाय उमेदवारांचे समीकरण, पक्षांची प्रतिष्ठा, मतदारांचे गणित यामुळे निवडणूक रंगात

खोपोली / विशेष प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उमेदवारांची अधिकृत नावे जाहीर झाली असून संपूर्ण शहरात राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नगराध्यक्ष पद सर्वसाधारण राखीव असून एकूण 7 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्याचबरोबर 15 प्रभागांत 31 नगरसेवक जागांसाठी बहुपक्षीय व अपक्षांचा प्रबळ सामना रंगत आहे.

* नगराध्यक्षपदासाठी सात जणांचे रिंगण :- नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे (शिवसेना-शिंदे गट) - धनुष्यबाण, डॉं. सुनील पाटील (राष्ट्रवादी - अजित पवार गट) - घड्याळ, तौफिक कर्जीकर (काँग्रेस) - हाताचा पंजा, डॉं. रियाज पठाण (आप) - झाडू, किशोर साळुंखे (अपक्ष) - बॅट, अनिल वाघमारे (अपक्ष) - ऑटोरिक्षा, ऋषिकेश कोंडुस्कर (अपक्ष) या सात नावांमुळे खोपोलीच्या राजकीय लढाईला त्रिकोणी नव्हे तर बहुकोनी वळण मिळाले आहे. प्रमुख स्पर्धा शिवसेना व राष्ट्रवादी, काँग्रेस, आप यांच्यात राहील, तर अपक्ष उमेदवारांची मते कशी विभागली जातील, यावर अंतिम निकालाचे चित्र अवलंबून असेल.


* शहरात 15 प्रभागांमध्ये 31 जागांसाठी काट्याची लढत :- खोपोली शहरातील 15 प्रभागांत 31 जागा असून सर्वच प्रभागांत बहुपक्षीय स्पर्धा तीव्र आहे. 


- प्रभाग 1 (ओबीसी महिला व सर्वसाधारण)

एकूण मतदार : 4966

अ.जा. 467 | अ.ज. 176

क्षेत्र : लव्हेज, मस्को अधिकारी, कामगार वसाहत

उमेदवार ओबीसी महिला : सुजाता जारे (घड्याळ), श्रुती पालांडे (धनुष्यबाण).


सर्वसाधारण : गयासुद्दीन खान (झाडू), मंगेश दळवी (घड्याळ), संदीप पाटील (धनुष्यबाण).


-  प्रभाग 2 - (अ.जा. व सर्वसाधारण महिला)

एकूण मतदार : 4864

अ.जा. उमेदवार - हेमा अनिवार (घड्याळ), अमित फाळे (धनुष्यबाण), अर्चना शिवशरण (झाडू), माधुरी राजगुरु (गॅस), शंकर वाघमारे (सायकल पंप), संजय सोळंकी (मशाल).


सर्वसाधारण महिला - नंदा काळोखे (कपबशी), मानसी काळोखे (धनुष्यबाण), उर्मिला देवकर (घड्याळ), ज्योती देशमुख (मशाल), योगिता माने (नारळ), प्रियंका म्हेत्री (ट्रक), मंगला पाटील (दूरदर्शन).


- प्रभाग 3 (अ.जा. महिला व सर्वसाधारण)

एकूण मतदार : 4977

अ.जा. महिला -  माधुरी तांबे (घड्याळ), सुवर्णा मोरे (तुतारी), मिताली वाघमारे (गॅस), प्राची कांबळे (धनुष्यबाण).


सर्वसाधारण - प्रकाश गायकवाड (टीव्ही), रेखा जाधव (हात), सुमित जाधव (गॅस), किशोर पानसरे (घड्याळ), अनिल सानप (धनुष्यबाण).


- प्रभाग 4 (ओबीसी व सर्वसाधारण महिला)

एकूण मतदार : 4446

ओबीसी -  विनायक तेलवणे (घड्याळ), माधवी रिठे (धनुष्यबाण)


सर्वसाधारण महिला - श्रुती लांडगे (गॅस), वर्षा साळुंके (घड्याळ), प्रतीक्षा रेटरेकर (कमळ)


- प्रभाग 5 (अ.जा. महिला व सर्वसाधारण)

एकूण मतदार : 4709

अ.जा. महिला - हर्षदा गायकवाड (घड्याळ), सावित्री जाधव (गॅस), सोनिया रूपवते (कमळ)


सर्वसाधारण - संजय कचरे (चावी), इंदरमल खंडेलवाल (कमळ), सचिन मसूरकर (घड्याळ)



- प्रभाग 6 (सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण)

एकूण मतदार : 4656

महिला - मदिना पटेल (झाडू), जयश्री गायकवाड (तुतारी), मयुरी शेलार (धनुष्यबाण), कुंदा वझरकर (घड्याळ), माधवी पुरी (मशाल)


सर्वसाधारण - योगेश औटी (घड्याळ), संजय तन्ना (कमळ), अरुण पुरी (खटारा), कीर्तीकुमार ओसवाल (मशाल), राहुल गायकवाड (बस), योगेश पुरी (कपबशी), शेख हारुण (हात)


- प्रभाग 7 (ओबीसी महिला व सर्वसाधारण)

एकूण मतदार : 4277

ओबीसी महिला - ऐश्वर्या पाटील (घड्याळ), ज्योती मिरवणकर (रोड रोलर), सुजाता मोरे (कमळ), नम्रता हांगे (कपबशी)


सर्वसाधारण - धमेंद्र चव्हाण (झाडू), इंद्रजीत गौड (पुस्तक), दिलीप जाधव (धनुष्यबाण), रवि रोकडे (खटारा), प्रशांत शेंडे (घड्याळ)


- प्रभाग 8 (ओबीसी व सर्वसाधारण महिला)

एकूण मतदार : 4245

ओबीसी - गायत्री जाधव (घड्याळ), रूपाली जाधव (धनुष्यबाण)


सर्वसाधारण महिला - रुखसाना जलगावकर (धनुष्यबाण), गायत्री जाधव (स्कुटर), प्रिया फावडे (घड्याळ), शकिला शेख (झाडू), शरीफा शेख (हात)



- प्रभाग 9 (अ.ज. व सर्वसाधारण महिला)

एकूण मतदार : 4989

अ.ज. - राजा डुमणे (धनुष्यबाण), अंकिता शीद (मशाल), गणेश सुतक (खटारा)


सर्वसाधारण महिला - नसरीन खान (झाडू), रजिया खान (धनुष्यबाण), तस्लीम पाटील (खटारा)



- प्रभाग 10 (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)

एकूण मतदार : 6903

ओबीसी महिला - सुरेखा खेडकर (मशाल), रोशनी परदेशी (झाडू), अनिता पवार (धनुष्यबाण), मेघा वाडकर (घड्याळ)


सर्वसाधारण महिला - दर्शना आंग्रे (घड्याळ), सलमा पठाण (हात), उज्वला महाडिक (धनुष्यबाण), वैशाली वाघमारे (झाडू)


सर्वसाधारण - हरीश काळे (धनुष्यबाण), स्वप्नील कुंडले (कपबशी), सुशांत जाधव (गॅस), उबेद पटेल (घड्याळ), रियाज पठाण (झाडू)



- प्रभाग 11 (सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण)

एकूण मतदार : 4189

महिला - सोनाली मगर (फुटबॉल), शिल्पा मालकर (खटारा), सानिया शेख (कमळ)


सर्वसाधारण - विक्रम साबळे (कमळ), संतोष मालकर (खटारा)



- प्रभाग 12 (ओबीसी महिला व सर्वसाधारण)

एकूण मतदार : 4644

ओबीसी महिला - विनिता कांबळे (खटारा), शबाना शेख (धनुष्यबाण), तन्वी रुपवते (मशाल)


सर्वसाधारण - रॉबिन सॅम्युअल (धनुष्यबाण), निजामुद्दीन जलगावकर (खटारा)



- प्रभाग 13 (ओबीसी व सर्वसाधारण महिला)

एकूण मतदार : 4851

ओबीसी - गणेश आखाडे (गॅस), अविनाश किरवे (धनुष्यबाण), अनिल गायकवाड (घड्याळ), नितीन पवार (मशाल), मुमताज मन्सुरी (झाडू), तैय्यब शेख (हात)


महिला - जयश्री चाळके (मशाल), संचित भोसले (हात), वंदना सावंत (धनुष्यबाण), प्रमिला सुर्वे (घड्याळ)



- प्रभाग 14 (ओबीसी व सर्वसाधारण महिला)

एकूण मतदार : 4172

ओबीसी - रोहिणी नायकोडे (मशाल), अभिषेक परदेशी (झाडू), किशोर पाटील (धनुष्यबाण), दत्तात्रय मसूरकर (घड्याळ)


महिला - रेश्मा गायकवाड (धनुष्यबाण), प्रतिभा देशमुख (घड्याळ)


- प्रभाग 15 (सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण)

एकूण मतदार : 4253

महिला - स्वेला अहीर (घड्याळ), रंजना सावंत (कपबशी), जिनी सॅम्युअल (धनुष्यबाण)


सर्वसाधारण - संदीप पाटील (धनुष्यबाण), गणेश राक्षे (घड्याळ)



* निर्णायक लढतींचे केंद्र - मतदारांचे मौन अटळ :- खोपोलीतील अनेक प्रभागांत तिरंगी व चौकोनी लढती दिसत असून मुस्लिम मतदार, ओबीसी महिला आरक्षण, अनुसूचित समाजाचा निर्णायक प्रभाव, मोठ्या पार्ट्यांचे व अपक्षांचे वर्चस्व यामुळे सर्व प्रभागांत रोमांचक स्पर्धा रंगणार आहे.



* 3 डिसेंबरला खोपोलीच्या भविष्याचे चित्र उलगडणार :- दृश्यक निकाल काय लागणार हे सांगणे कठीण असले तरी मतदारांच्या प्रतिक्रिया, प्रभागनिहाय गणित आणि उमेदवारांची ताकद यामुळे खोपोलीची निवडणूक राज्यभरात चर्चेची ठरणार हे निश्चित.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement