Type Here to Get Search Results !

सरदार एस.के. पवार विद्यालयात विज्ञान - गणित साहित्य प्रदर्शन उत्साहात

* इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांची 40 हून अधिक प्रकल्पांची मांडणी

नगरदेवळा / प्रतिनिधी :- सरदार एस. के. पवार माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा येथील उर्दू विभाग आयोजित विज्ञान व गणित विषयाचे शैक्षणिक साहित्य प्रदर्शन आज, 29 नोव्हेंबर 2025 रोजी उत्साहात पार पडले. इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 40 पेक्षा अधिक प्रकल्प व साहित्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या कुतूहल, कौशल्य आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाला वाव देणारा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

कार्यक्रमाचे उद्घाटन ग्राम शिक्षण समिती, नगरदेवळा संस्थेचे मानद सचिव शिवनारायण जाधव यांनी फित कापून केले. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रकल्प पाहून त्यांच्याकडून सादरीकरणाची माहिती ऐकली आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे मानद सचिव शिवनारायण जाधव यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक अब्दुल गनी सेठ उपस्थित होते.


प्रदर्शनाला शाळेचे मुख्याध्यापक किरण काटकर सर, उपमुख्याध्यापक गहरवाल सर, संस्कृती विभाग प्रमुख संजीव बावस्कर सर, विज्ञान विभाग अध्यक्ष प्रा. उमेश काटकर सर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हिरालाल सर, तसेच समाधान ठाकूर सर, पी. आर. तायडे सर, जाकीर अली सर, अहमतेशाम सर, जहांगीर सर, अफरोज सर, मोहसीन सर, इरम मॅडम आणि पालकांसह अनेक मान्यवरांनी भेट दिली.


प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विषयांमध्ये सौरऊर्जा मॉडेल, जलचक्र, मानवी शरीर रचना, गणिती आकृत्या व संकल्पना, प्रदूषण नियंत्रण मॉडेल, विद्युत परिपथ भूकंप अलर्ट प्रणाली यांसारखे अभिनव प्रकल्प समाविष्ट होते. विद्यार्थ्यांनी आपल्या मॉडेल्सविषयी दिलेली माहिती मान्यवरांनी आवर्जून ऐकून घेतली आणि सर्वांनी अभिनंदन केले.


मुख्याध्यापक किरण काटकर सरांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून त्यांना विज्ञान क्षेत्रात पुढे जाण्यास प्रोत्साहित केले. अब्दुल गनी सेठ यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकता आणि तांत्रिक कौशल्याचे कौतुक केले. अध्यक्ष बापूसाहेब जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इकबाल शेख सर, प्रास्ताविक सादिक शेख सर तर आभार कलीम शेख सर यांनी मानले.  प्रदर्शनासाठी उर्दू विभागातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. अब्दुल गनी सेठ, प्रा. उमेश काटकर सर आणि सर्व शिक्षकांच्या हस्ते प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान केली. विज्ञान - गणित प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला आणि शैक्षणिक क्षमतेला योग्य व्यासपीठ मिळाले. पालक, शिक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक उभारी मिळाली. विद्यालयातील उर्दू विभागाने केलेले हे प्रदर्शन "ज्ञान व प्रयोग" यांची सुंदर सांगड घालणारे ठरले.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement