Type Here to Get Search Results !

कला उत्सवातील जिल्हा विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

* गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी राष्ट्रीय स्तरासाठी दिल्या शुभेच्छा

* सरदार एस. के. पवार विद्यालयातील विद्यार्थ्यांचा यशस्वी गौरव

नगरदेवळा / प्रतिनिधी :- पाचोरा तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या कला उत्सव स्पर्धेत जिल्हा स्तरावर चमकलेल्या सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा येथील पुरुषोत्तम सुकदेव मिस्तरी आणि गौरव विनोद मिस्तरी या विद्यार्थ्यांचा गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

* विद्यार्थ्यांचा मानाचा सत्कार :- 25 नोव्हेंबर रोजी नगरदेवळा केंद्र शिक्षण परिषदेमार्फत विद्यालयामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी पवार यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


त्यांनी याप्रसंगी सांगितले की, कला उत्सवातील हे यश केवळ दोन विद्यार्थ्यांचे नव्हे, तर संपूर्ण तालुक्याचा सन्मान आहे. अशा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना राज्य व देशपातळीवर पोहोचवतात.


* मार्गदर्शक शिक्षकांचा देखील गौरव :- विद्यार्थ्यांच्या यशामागे मोलाची भूमिका बजावणारे प्रा. उमेश काटकर सर, प्रा. एस. एच. जोशी सर यांचा देखील विशेष सत्कार करून मान्यवरांनी त्यांच्या परिश्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमास केंद्र प्रमुख चंद्रकांत मोराणकर, प्राचार्य के. एन. काटकर सर व नगरदेवळा केंद्र शिक्षण परिषदेतील अधिकारी, शिक्षकवृंद आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन मीनाक्षी पाटील मॅडम यांनी केले तर आभार मोराणकर सर यांनी मानले.


* राष्ट्रीय स्पर्धा पुण्यात :- डिसेंबर महिन्यात पुणे येथील यशदा (YASHADA) कार्यालयात राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, नगरदेवळा विद्यालयातील दोन्ही विद्यार्थी पाचोरा तालुका व जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement