Type Here to Get Search Results !

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत एस. के. पवार विद्यालयाचा चमकदार ठसा

* प्रितेश पाटील व जान्हवी दंडगव्हाळ यांना द्वितीय क्रमांक

* मार्गदर्शक प्रा. डॉं. किरण चव्हाण सरांचा विद्यार्थ्यांना उत्तम हातभार

पाचोरा / प्रतिनिधी :- मुख्याध्यापक संघ, जळगाव यांच्या वतीने 27 नोव्हेंबर रोजी पाचोरा येथील कृष्णापुरी विद्यालयात आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करीत विद्यालयाचा गौरव वाढविला.

ज्युनिअर कॉलेज गटात इयत्ता 11वीतील प्रितेश शरद पाटील याने प्रभावी मांडणी करीत द्वितीय क्रमांक पटकाविला. तर माध्यमिक गटात इयत्ता 10 वीतील जान्हवी अजय दंडगव्हाळ हिनेही उत्कृष्ट वक्तृत्व कौशल्य दाखवत द्वितीय क्रमांक मिळवला. इयत्ता 10 वीतील चैताली रोशन पाटील हिनेही या स्पर्धेत उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला.


कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्याध्यापक किरण पाटील सर तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.


या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामागे प्रा. डॉं. किरण चव्हाण सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना वक्तृत्वकलेतील बारकावे, विषयाची सखोल मांडणी आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी विशेष मेहनत घेतली.


ग्रामशिक्षण समितीचे सेक्रेटरी शिवनारायण जाधव, व्हा. चेअरमन सुभाष थेपडे, संचालक किशोर पाटील, जगन पाटील, वामन पाटील, गनी शेख यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले. विद्यालयाचे प्राचार्य के. एन. काटकर सर, उपप्राचार्य व्ही. बी. गहवाल सर, पर्यवेक्षक वाय. डी. ठाकूर सर, डी. पी. राजपूत सर, तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


एस. के. पवार विद्यालयाच्या या यशस्वी कामगिरीमुळे नगरदेवळा परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून, विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर केलेली चमकदार कामगिरी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement