अ. नगर / प्रतिनिधी :- श्री शंभुकलश काव्यसंस्था व सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेचे पहिले राज्यस्तरीय कवी संमेलन अहिल्यानगर येथे ९ नोव्हेंबर रोजी हॉटेल यश पॅलेस येथे पार पडले. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून झाली. या संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक डॉं. संजय बोरुडे, संमेलनाध्यक्ष चंद्रकांत वानखेडे, स्वागताध्यक्ष नागेश शेलार, शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
या संमेलनाचे प्रमुख पाहुणे सुनील गोसावी, जेष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे, आनंदा साळवे, कवयित्री रंजनताई बोरा, कवयित्री सुनीताताई वाळुंज, अध्यक्ष महादेव लांडगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी उपाध्यक्ष संजय शेळके, सचिव बाळासाहेब घोरपडे, संस्थेचे संघटक अनिकेत औसरमल, सहसचिव विश्वेश्वर बोडखे, कार्याध्यक्ष देविदास थोरात, प्रसिद्धी प्रमुख पत्रकार अक्षय विधाते यांनी विशेष परिश्रम घेतले.
संमेलनात राज्यभरातून मोठ्या संख्येने साहित्यिक आले होते. डाॅं. संजय बोरुडे व प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी साहित्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच नागेश शेलार यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. अत्यंत बहारदार सुत्रसंचालन नवनाथ पोकळे व देव थोरात यांनी केले. विश्वेश्वर बोडखे यांनी संमेलनात महत्वाची जबाबदारी पार पाडली. राज्यभरातून संमेलनात सहभागी होण्यासाठी निवृत्ती एकनाथ पाचपोर, विजय भद्रीगे, चंद्रकांत घाडगे, किशोर पांचाळ, संजय वसंत पातुरकर, संतोष वसंत तावडे, गोकुळ गायकवाड, दादासाहेब
पठारे, शंकर शिंदे, अशोक उघडे, रुपचंद शिदोरे, डॉं. दत्ता ठुबे, चंद्रकांत नरटे, मोहन वाकचौरे, उमेश गोरे, वैजनाथ जाधव, दिव्या लोंढे, सारिका नळकांडे. अलका खोसे, संतोष स्वामी कपाळे, नाथकुमार घोलवाड, सुनिल थोरात, दशरथ बावस्कर, संभाजी दराडे, बाळासाहेब रोहोकले, नागोराव सोनकुसरे, बाबासाहेब ढोबळे, निवृत्ती महाराज कानवडे, शांतीलाल ननवरे, सार्थक बेडके, आशा लोंढे, सचिन चव्हाण, प्रा. मकरंद पाटील, एकनाथ पवार, सुनिल (महाराज) केकाण, डी. आर. बांगर, दिनेश चव्हाण आदी कवींनी या संमेलनात सहभाग घेतला होता. यावेळी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, कडा येथील गांधी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉं. अनिल गर्जे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments