Type Here to Get Search Results !

शिवसेना युवती सेनेचा उपक्रम गाजला!

* युवती प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत EKYC सेवा ; 50 बहिणींचा ऑनलाईन लाभ

खालापूर / प्रतिनिधी :- शिवसेना युवती सेनेतर्फे महिलांसाठी उपयुक्त आणि समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. युवती प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या उपक्रमात लाडक्या बहिणींची EKYC ऑनलाईन सेवा मोफत करून देण्यात आली.

या उपक्रमात परिसरातील 50 महिलांनी सहभाग घेतला आणि आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणीनंतर त्यांची EKYC प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहता उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


* महिलांसाठी महत्त्वाची मदत :- आजच्या डिजिटल युगात विविध शासकीय व आर्थिक योजनांसाठी EKYC आवश्यक ठरत आहे. या प्रक्रियेत अनेक महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. हे लक्षात घेऊन युवती सेनेतर्फे हा मोफत डिजिटल सहाय्य उपक्रम राबविण्यात आला.


* कार्यकर्त्यांचा सहभाग, लाभार्थ्यांचे समाधान :- युवती सेनेतील कार्यकर्त्यांनी महिलांना मार्गदर्शन करून ई - प्रक्रिया सहज व विनामूल्य करून दिली. या सेवेमुळे महिला सक्षमीकरण, डिजिटल साक्षरता वाढ, समाजाभिमुख कार्यात युवती सेनेची अग्रणी भूमिका असे सकारात्मक परिणाम दिसून आले.


* शिवसेना युवती सेनेचे उद्दिष्ट :- प्रत्येक बहिणीपर्यंत शासकीय सुविधा व डिजिटल सेवा पोहोचवणे, महिलांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर राहणे असे सांगण्यात आले.


या उपक्रमाच्या यशानंतर महिलांचा उत्साह पाहून पुढील दिवसांमध्ये आणखी असे मोफत EKYC, सरकारी योजना मार्गदर्शन व डिजिटल प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचे संकेत देण्यात आले. शिवसेना युवती सेनेचा हा उपक्रम महिला सक्षमीकरणाचा आणि डिजिटल भारताच्या दिशेने टाकलेले मोलाचे पाऊल ठरला आहे. स्थानिक नागरिकांनी व महिलांनी उपक्रमाचे कौतुक केले आहे.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement