Type Here to Get Search Results !

हनुमान जयंतीनिमित्त कोराडीत महाप्रसाद वितरण

* भक्तीमय वातावरणात धार्मिक कार्यक्रम संपन्न

* स्वामी विवेकानंद रुग्णालयाजवळ हनुमान चालीसा पठण व महाआरती ; भाविकांची मोठी उपस्थिती

कोराडी / प्रतिनिधी :- श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने कोराडी येथील स्वामी विवेकानंद रुग्णालयासमोर भक्तीमय वातावरणात महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. श्री आदिनाथ युवा ब्रिगेडच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात श्री हनुमान चालीसा पठणाने झाली. त्यानंतर महाआरती पार पडली. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित भाविकांनी ‘जय बजरंगबली’च्या जयघोषात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महाआरतीनंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला.


या कार्यक्रमाला श्री आदिनाथ युवा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रुद्रप्रताप सिंह ठाकुर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच रणजीत बेलेकर, जितू बेलेकर, मेघराज बेलेकर, दिशांत मांडवकर, हर्ष बारमांते, मंथन बारमांते, पियूष बारमाते, अनिकेत वटकर, जयंत सोनी, सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक जामदार, संदीप घुरीले, निरंजन घुरिले आदी उपस्थित होते.


या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी आदिनाथ युवा ब्रिगेडचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्थानिक नागरिक आणि भाविकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवित कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement