चोपडा / प्रतिनिधी :- तालुक्यातील हातेड खुर्द येथील गावठाण शिवारातील 93 लाभार्थींचा तिढा अद्याप सुटत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हातेड खुर्द गावठाण शहरातील गट नंबर सहा मधील क्षेत्र दोन हेक्टर 57 आर जमीन 93 लाभार्थींना वाटप करायची आहे. या संदर्भात शासनाने संबंधितांना आदेश करूनही ग्रामसेवक व भूमि अभिलेख कर्मचारी हे आपली जबाबदारी झटकून या कामी अडचणी आणत आहेत, असा आरोप सेवानिवृत्त तलाठी आदींसह 93 लाभार्थ्यांनी केला आहे.
शासनाकडून जमिनी मिळूनही त्यावर मात्र जुन्या खुणा दिसत नसल्याने लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चार ते पाच लोकांनी यावर 500 ते 600 स्क्वेअर फुट बांधकाम केले आहे. उर्वरित लाभार्थी घरकुलांसाठी थांबले आहेत. परंतु यात ग्रामसेवक सातबारा उतारावर वारस लावून देत नाही ? शिवाय ग्रामपंचायत त्याची नोंद करता घेत नाही ? जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश होऊनही संबंधित कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
निंबाजी दिनकर बोरसे, दिवाकर बाविस्कर, सुधाकर पाटील, रामा सोनवणे, नवल पाटील आधी 93 ग्रामस्थांनी या संदर्भात लेखी निवेदन जारी केले असून ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि भूमि अभिलेख या दोघांनी वेळेत आपले काम पूर्ण न केल्याने प्लॉट वाटप काम रखडले आहे. ग्रामसेवक टाळाटाळ करीत आहेत तर भूमी अभिलेखवाले साहेब रजेवर गेले आहेत, नंतर पाहू अशी बेजबाबदारपणे उत्तरे देतात. याकामी झारीतील शुक्राचार्य कोण ? याचा शोध जिल्हाधिकारी यांनी घ्यावी, अशी मागणी 93 लाभार्थींनी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


Social Plugin