Type Here to Get Search Results !

आतंकवादाच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाची निषेध रॅली


* पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन पाकिस्तानी आतंकवादाचे समूळ उच्चाटन करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई / प्रतिनिधी :- जम्मू काश्मीरच्या पहेलगाममध्ये निर्दोष भारतीय पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 27 जणांचा जीव गेला आहे. या निर्घृण अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि या अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातर्फे आज भर दुपारी रखरखत्या उन्हात बांद्रा पूर्व कलानगर म्हाडा ऑफिस या भागात रॅली काढण्यात आली. पाकिस्तान बरोबर आता आरपारची लढाई केली पाहिजे. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन पाकिस्तानी आतंकवाद समूळ नष्ट केला पाहिजे. पाकला एकदा युद्धाचा जोरदार शॉक दिलाच पाहिजे, असे ना. रामदास आठवले यांनी सांगितले.


बांद्रा पूर्व येथील आतंकवाद विरोधी निषेध रॅलीचे आयोजन रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश तर्फे करण्यात आले अशी माहिती रिपाईचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी दिले. रिपब्लिकन पक्षाच्या आतंकवाद विरोधी रॅलीचे नेतृत्व रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, मुंबई सरचिटणीस विवेक पवार, जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड, संजय पवार, अजित रणदिवे, प्रकाश जाधव, संजय डोळसे, रवी गायकवाड, सचिनभाई मोहिते यांनी केले. महिला आघाडीच्या ॲंड आशाताई लांडगे, अभया सोनवणे, उषाताई रामलू तसेच रिपाईचे श्रीकांत भालेराव, सोहेल शेख, योगेश शिलवंत, विजय वंजारी, सोना कांबळे, रतन अस्वारे, अमित तांबे, चंद्रकांत पाटील, रशीद अन्सारी, भारती गुरव, रत्ना शिंदे आदी उपस्थित होते.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement