Type Here to Get Search Results !

कर्जतमधील जीवन बडेकर यांची माणुसकी


* जखमी अवस्थेत असलेल्या मोराला दिले जीवदान !

कर्जत / नरेश जाधव :-  कर्जतमधील कर्जत चौक मार्गांवरील मस्त मराठी हॉटेलचे मालक जीवन बडेकर व सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड यांच्यातील माणुसकीचे आज दर्शन झाले. त्यांच्या माणुसकीमुळे एका जखमी मोराला जीवनदान मिळाले आहे.


कर्जत तालुक्याची मुख्य ओळख ही पर्यटन तालुका अशी असून, या तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल भाग तसेच अभयारण्य व माथेरान सारखे निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण लाभले असल्याने, या भागांमध्ये वन्य व हिंस्त्र  प्राण्यांसह व मोर यांचे मोठ्या प्रमाणत वास्तव्य आहे. तर माथेरान डोंगर रांगेत मोठ्या प्रमाणात मोरांचे वास्तव्य असल्याचे पहावयास मिळत आहे. अशाच माथेरान डोंगर रांगेत येणाऱ्या व कर्जत चौक या मार्गांलगत असलेल्या  डोंगर भागात असलेले मस्त मराठी हॉटेल परिसरात झाडीझुडपात एक जखमी मोर हा तडफडत्या अवस्थेत मस्त मराठी हॉटेलचे मालक जीवन बडेकर यांना दिसून आला.


राष्ट्रीय पक्षी अशी मोराची ओळख असल्याने, या बाबीचे गांभीर्य ओळखून व सामाजिक कर्तव्याचे भान राखत माणुसकीच्या भावनेतून तत्काळ कर्जतमधील सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड यांना या घटनेची माहिती देत त्यांना बोलावून घेवून त्या जखमी मोराला दोघांनी प्रथम पाणी पाजले आणि सदर घटनेची माहिती ही वन विभागाला देऊन सदर जखमी मोराला वन विभागाच्या ताब्यात देत पशुवैद्यकीय यांच्याकडे उपचाराकरीता  नेण्यात आले. या जखमी मोरावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉं. अशोक गोडवे, डॉं. सुरेखा वाघमोडे, डॉं. सुर्वणा लता मनगोळी व जयेंद्र कांडे यांच्या माध्यमातून प्राथमिक उपचार करण्यात आले असून मस्त मराठी हॉटेलचे मालक व सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड यांच्या सर्तकतेमुळे या जखमी मोराला जीवनदान मिळाले आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement