कर्जत / प्रतिनिधी :- आ. महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कर्जत नगर परिषद अंडरआर्म बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीग २०२५ – पर्व २ या बहुचर्चित क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाई गायकर व कर्जत नगर परिषद उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांच्या हस्ते आणि नगरसेवक ॲंड. संकेत भासे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेला सुरुवात झाली.
या वर्षीच्या पर्वात तब्बल ३२ संघांनी सहभाग नोंदविला असून स्पर्धेला सुरुवातीपासूनच प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. उद्घाटनप्रसंगी बोलताना ॲंड. संकेत भासे म्हणाले की, आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त खेळाडूंना व्यासपीठ देणे, त्यांचे कौशल्य समोर येणे, हा आमचा मुख्य हेतू आहे. कर्जत-खालापूर परिसरात खेळसंस्कृती वाढावी यासाठी शिवसेना कटीबद्ध आहे.
या सोहळ्यास शिवसेना कर्जत शहर सर्व पदाधिकारी, संघमालक, सर्व खेळाडू व शेकडो प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवा खेळाडूंना व्यासपीठ देणारा हाच उपक्रम दरवर्षी अधिक जोमाने राबविण्याचा आमचा संकल्प आहे.



Social Plugin