Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रात 'अश्लीलता मुक्त' अभियान

* पत्रकार प्रतिभा शेलार यांचे विचार अश्लीलता मुक्त अभियानात सहभागी होण्याचे आवाहन!

सातारा / प्रतिनिधी :- सध्या सुसंस्कृत महाराष्ट्रात अश्लिलता मोठ्या प्रमाणावर पसरवली जात आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये चित्रपट, वेब सीरीज, स्टेज शो अशा कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर अश्लीलता दाखविण्यात येत आहे, त्यामुळे आपल्या समाजातील अल्पवयीन मुले-मुली, युवापिढी, महिला व पुरुष वर्ग यांच्या मनावर व आयुष्यामध्ये विकृती निर्माण होत आहेत. अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र अश्लीलता मुक्त अभियानाची सुरुवात सुरू करण्यात आली आहे. तरी इच्छुकांनी विचार अश्लीलता मुक्त अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश संयोजक प्रतिभा शेलार यांनी केले आहे.

पत्रकार प्रतिभा शेलार या नेहमीच अश्लिलता रोखण्यासाठी प्रयत्नशील असतात. समाज घडविण्यासाठी त्या नेहमीच विविध माध्यमातून काम करीत आहेत. संत भूमी असलेल्या महाराष्ट्रात अश्लिलता निर्माण झाल्याने शेलार दु:खी झाल्या असून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी अश्लीलता मुक्त अभियानाची सुरुवात केली आहे. तरी सभासद नोंदणी व अभियानात सहभागी होण्यासाठी 96/A, जय भवानी लाईट हाऊस समोर, गिते बिल्डिंग रोड, रविवार पेठ, सातारा या ठिकाणी प्रत्यक्ष भेटावे अन्यथा 9309874110 या क्रमांकावर तसेच mahalaxmiaadharfoundation@gmail.com या ईमेलच्या माध्यमातून सहभागी होता येईल, असे अभियानाच्या संचालिका प्रतिभा शेलार यांनी सांगितले.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement