* ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञानातून होणार मार्गदर्शन
माळशिरस / प्रतिनिधी :- श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर यांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या 100 दिवसीय कृती आराखड्यानुसार ऊस विकास योजनेंतर्गत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एआय (AI) तंत्रज्ञान व ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिवामृत दूध संघ लिमिटेड विजयनगर विझोरी चेअरमन खा. धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील राहतील.
या कार्यक्रमासाठी आ. उत्तमराव शिवदास जानकर उपस्थित राहतील. शनिवार, 19 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता कारखाना कार्यस्थळावर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते डॉं. विवेक भोईटे (विशेषतज्ञ मृदा शास्त्र विभाग कृषी विज्ञान केंद्र बारामती) हे ऊस पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI तंत्रज्ञान) वापर... डॉं. समाधान सुरवसे (शास्त्रज्ञ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे) हे ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करतील. तरी सर्व सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन आ. रणजितसिंह मोहिते पाटील, व्हा. चेअरमन अॅड मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख व सर्व संचालक मंडळ श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर यांनी केले आहे.


Social Plugin