Type Here to Get Search Results !

शहीद पोलिस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना थेट पोलिस उपअधीक्षक

 


मुंबई / प्रतिनिधी :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले पोलिस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी श्रीमती कल्पना पवार यांना परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षकपदावरील थेट नियुक्तीचे आदेश प्रदान करण्यात आले. ही नियुक्ती करतांना मुख्यमंत्री यांनी शहीद पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी असलेली शासनाची कृतज्ञता आणि संवेदनशीलता पुन्हा एकदा प्रत्यक्ष कृतीतून दाखवली आहे.


मुख्यमंत्री यांच्या या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करतांना कल्पना पवार म्हणाल्या की, माझ्या पतीप्रमाणेच मलाही आता देशसेवेची संधी मिळाली आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, लाडक्या बहिणींचे आणि देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या शहीद वीरांचे आहे, हे माझ्या या नियुक्तीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement