Type Here to Get Search Results !

नातेपुते नगरपंचायती प्रारूप विकास आराखड्याबाबत निवेदन

* संघर्ष समितीकडून 11 मागण्यांचे निवेदन सादर 

नातेपुते / प्रतिनिधी :- 14 एप्रिल रोजी घटनाकार भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाल्यानंतर 15 एप्रिल 2025 रोजी नातेपुते नगरपंचायतीच्या कार्यालयात बैठक संपन्न झाली. 28 एप्रिल 2025 रोजी 1966 चे कलम 28 पोटनियम 4 या नियमाची मुदत संपत असल्याकारणाने नगर पंचायतीसमोर चूल पेटव आंदोलनाचा इशारा संघर्ष समितीकडून देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर नातेपुते नगर पंचायतीकडून 15 एप्रिल 2025 रोजी 1966 कलम 28 पोटनियम 4 च्या बाबत चर्चा करण्यासाठी नगरपंचायतीमध्ये संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला निमंत्रित करण्यात केले होते. 

या बैठकीत संघर्ष समितीकडून 11 मागण्याची सूची जाहीर करण्यात आली. त्यात प्रारूप विकास आराखडा हा पुढील 40 वर्ष गृहीत धरून केलेला आहे, परंतु 2011-12 ला प्रादेशिक योजना लागू झाली. त्या नकाशामध्ये प्रारूप विकास आराखडा लागू झाल्याने सर्वत्र रस्त्याची खिचडी होताना दिसत आहे, त्यामध्ये येलोझोन वाढवावा...नातेपुतेमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती असलेले भाग व आडव्या वस्त्यांवर असलेली वसाहत तेच ठिकाण येलोझोनमध्ये घेण्यात यावे. विशेषता बोराटे मळा एक, बोराटे मळा दोन, काळे मळा, सूर्या धाबा, नजीकची पांढरे वस्ती, राऊत वस्ती, काळे मळा, दहेगाव रोड, नगर शंभू नगरी, झगडे मळा, कोण, फोन्डशिरस रोड, बरडकर मळा, टेंबरे मळा, जठार वस्ती व वाढीव भागाच्या शेवटी त्यांच्या हद्दीतून त्यांना लगत रिंग रोड टाकण्यात यावा...पुणे-पंढरपूर रोड, दहिगाव रोड, वर्षा मेडिकल शेजारील पिरळे रोड आहे तेवढाच ठेवणे...26 ठिकाणी शेतजमिनीवर टाकलेली आरक्षणे काढून शासकीय जमिनीवर टाकावेत...जुने प्रांत, तहसीलदार येथे असलेली ठिकाणी रस्ते दाखविणे,  उदाहरणार्थ 742,743,746,744,745 शंभू नगरीतील रस्ते गोल्डन सिटीतील रस्ते नकाशावर दाखवणे...उमाजी नाईक एक नगर येथील औद्योगिक वसाहत संपूर्णतः काढून वगळणे...सद्गुरु कॉलनीतील पंधरा मीटरचा रस्ता एका बाजूने जाणे व दुसऱ्या बाजूने येणे अशा पद्धतीने करावा...रिंग रोड किंवा नगर पंचायतीने रस्ते टाकताना सर्वे नंबरचे बांध फिक्स करून मोजणी करून नंतर ते समांतर टाकावेत...नव्याने बिल किती करताना ओपन फेस तोडलेले आहेत. नगरपंचायतीने ते डेव्हलपमेंटसाठी घ्यावे...पालखी मैदान माऊली मंदिराशेजारील रोड सदर गट नंबर 661 मधून 658 मध्ये गेला आहे आणि तिथून थेट 673 गटांमध्ये गेलेला आहे. यामध्ये कुठेही 671, 664 बाधित होत नाही पण नवीन प्रारूप विकास आराखडामध्ये रस्ता बाधित झाल्याचे दिसत आहे, त्यामध्ये बदल करून मिळावा. माऊली मंदिरा शेजारील पालखी मैदानाच्या पूर्वेकडील रस्ता एवढा आहे तेवढाच ठेवावा...जुना मांडवे रोड निसर्ग सिटी येथील 15 मिनिटांचा रस्ता येणे झालेल्या जागेमध्ये दाखविला आहे, त्यामध्ये सुधारणा व्हावी. याप्रमाणे कोणत्याही नागरिकांची घरे न पडता, दुकाने बाधित न होता विकास आराखडा राबवावा असे संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

नगर पंचायतीमध्ये झालेल्या संघर्ष समितीच्या बैठकीत काय घडले, या संदर्भाची महत्त्वपूर्ण बैठक उमाजी नाईक नगर येथे बाबाराजे बोडरे यांच्या कॉम्प्लेक्ससमोर पार पडली. या बैठकीमध्ये शेकडो बाधित नागरिक, महिला हजर होत्या. यामध्ये संघर्ष समितीकडून नगर पंचायतीमध्ये काय घडले या बाबीचा तपशील संपूर्ण समितीकडून सर्व बाधित्यांना देण्यात आला. यावेळी संघर्ष समितीचे राजकुमार हिवरकर पाटील, बाबाराजे बोडरे, शिवजयंती महोत्सव समितीचे किशोर पलंगे, अभिमन्यू आठवले, सरस्वती साबळे, सुनीता सोनमळे, लैला शेख, हवाशी शेख, मंगल टेके, सुप्रिया भुसारे, सुशीला कदम, संगीता सुतार, उषा पवार, अभिजीत साळवे, दादा लोंढे, सुखदेव वाघमारे, राजू तांबडे, दीपक जठार, महावीर जोशी, संतोष थोरात, किरण टकले यांच्यासह बाधित हजर होते.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement