* प्रभाग क्रमांक 1 मध्ये संदीप राम पाटील मैदानात
* पहिल्याच प्रयत्नात इतिहास घडवण्यासाठी सज्ज
खोपोली / फिरोज पिंजारी :- खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 ची रणधुमाळी रंगात आली असून प्रभाग क्रमांक 1 मधील सर्वात चर्चेचे आणि तेजस्वी उमेदवार म्हणून संदीप राम पाटील यांचे नाव सध्या गाजत आहे. तरुणाईच्या मनात घर करणारे, सर्वसाधारण मतदारांचा ठाम विश्वास संपादन करणारे आणि नंबर 1 प्रभागातील नंबर 1 चे उमेदवार अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.
सुभाषनगर, जगदीशनगर, लौजी, वासरंग परिसरातील मतदारांनी संदीप पाटील यांच्या एकत्रित नेतृत्वाखाली शिवसेना (शिंदे गट) ला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे. अलीकडेच आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयी मोहिमेत पडद्याआडून मोठे योगदान देत त्यांनी आपली राजकीय दमदार उपस्थिती दाखवून दिली होती. विरोधक नसणारा, सर्वांचा लाडका ‘अजातशत्रू नेता’ अशी त्यांची प्रतिमा आधीच तयार झाली आहे.
* जनतेच्या मनात विकास आणि पाठीशी संदीप पाटील :- शेकडो समर्थकांसह शिवसेनेत केलेला प्रवेश, कुलदीपक शेंडे आणि दिलीप जाधव यांच्या नेतृत्वाची साथ, आणि प्रचंड जनसंपर्क ही संदीप पाटील यांची सर्वात मोठी ताकद.
* लोकप्रियता, निर्णयक्षमता आणि सर्वांना सोबत घेण्याची तयारी :- संदीप पाटील यांचा सर्वसमावेशक दृष्टिकोन, जनतेची कामे तत्परतेने करण्याची वृत्ती आणि तरुण नेतृत्वाचे जोशपूर्ण विचार या सगळ्यामुळेच ते पहिल्या प्रयत्नातच विजयी होणार याबद्दल मतदारांत एकमत तयार झाले आहे.
* उत्साहाचा महापूर : महिलेपासून युवापर्यंत सर्वांचा विश्वास :- प्रभागातील महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक “गुलाल आपलाच!” या घोषणेसह घराघरातून समर्थन देत आहेत. समाजकार्य, लोकसंपर्क आणि मदतीला सदैव धावून येण्याची तयारी यामुळेच संदीप पाटील यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे.


Social Plugin