* श्री साई चैतन्य धामतर्फे कराओके गायन स्पर्धा
* 1 - 2 नोव्हेंबर रोजी संगीत रसिकांसाठी मेजवानी
* विजेत्यांना रोख पारितोषिके आणि आकर्षक ट्रॉफीज
वसई / प्रतिनिधी :- नालासोपारा (पश्चिम) परिसरातील संगीतप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. श्री साई चैतन्य धामतर्फे शनिवार, 1 नोव्हेंबर आणि रविवार, 2 नोव्हेंबर 2025 रोजी दोन दिवसीय भव्य कराओके गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा श्री साई चैतन्य मंदिराच्या सभागृहात घेण्यात येणार असून स्थानिक कलाकारांना आपल्या स्वराचा जादू दाखविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
* संगीताच्या मंचावर स्वरसंपन्न लढत :- या कराओके स्पर्धेत नालासोपारा पूर्व–पश्चिम विभागातील पेल्हार ते भुईगाव आणि कळंब परिसरातील नागरिकांनाच सहभाग घेता येईल, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश फी 200 रुपये ठेवण्यात आली असून, ऑनलाईन नोंदणीची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
* विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके :- स्पर्धेत सहभागी सर्व गायकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तर विजेत्या स्पर्धकांना एकूण 30 हजार रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे आणि आकर्षक ट्रॉफीज देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा स्थानिक पातळीवरील नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणारी ठरणार असून, गायन क्षेत्रात रस असलेल्या तरुणांना आपले कौशल्य सादर करण्याची उत्तम संधी मिळणार आहे.
* नोंदणीसाठी संपर्क करा :- स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी ९८५०६७४०२७ / ८३५६०९७५५७ या क्रमांकांवर संपर्क साधावा. श्री साई चैतन्य धामचे आयोजक म्हणाले की, ही केवळ स्पर्धा नाही, तर संगीताच्या माध्यमातून समाजात एकतेचा आणि आनंदाचा संदेश देण्याचा उपक्रम आहे. आपल्या परिसरातील कलाकारांना संधी द्यावी आणि कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना प्रोत्साहन द्यावे. कराओकेच्या तालावर सादर होणाऱ्या या स्वरसंग्रामात नालासोपाऱ्यातील गायकांची कला, भावना आणि आवड सर्वांच्या मनात सूर लावून जाईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


Social Plugin