* उद्धव ठाकरेंना दे धक्का ; सुरेश (पप्पू) राजपूत शेकडों कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेत दाखल
* आमदार किशोर आप्पांचा मास्टर स्ट्रोक ; नगर परिषदेसह आगामी निवडणुकांचा खेळ बदलणार ?
पाचोरा / फिरोज पिंजारी :- पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्रात आज मोठा राजकीय स्फोट झाला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख सुरेश उर्फ 'पप्पू' राजपूत यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेना गटात प्रवेश करीत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास जाहीर केला आहे.
नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका दारात असताना पप्पू राजपूत यांच्या प्रवेशाने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, आगामी पाचोरा नगर परिषद निवडणुकीपूर्वीचा हा ‘मास्टर स्ट्रोक’ मानला जात आहे.
पाचोरा शहरात तसेच संपूर्ण विधानसभा मतदारसंघात पप्पू राजपूत यांना मोठा जनाधार आहे. त्यांच्यासोबत आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांमुळे शिंदे गटाची ताकद कोणत्याही समीकरणांना धक्का देणारी ठरणार आहे.
* भाजपविरोधात आमदार आप्पांची आक्रमक भूमिका :- गेल्या काही दिवसांपासून आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीविरोधात उघड युद्ध पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर पप्पू राजपूत यांचा प्रवेश हा आमदारांच्या लढ्याला मोठी धार देणारा ठरत असल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे.
* युवा नेतृत्वाला नवी धार :- पप्पू राजपूत हे लढाऊ व आक्रमक युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांची स्वच्छ प्रतिमा व कार्यकर्त्यांमध्ये असलेला दबदबा लक्षात घेता, हा प्रवेश पाचोरा नगर परिषदेसह पुढील विधानसभा निवडणुकीतही निर्णायक ठरू शकतो.
या प्रवेशावेळी आमदार किशोर आप्पा पाटील, जिल्हा प्रमुख रावसाहेब (जिभू) पाटील, शिवसेना नेते दीपक राजपूत, अरूण पाटील, गणेश पाटील, नंदू पाटील, धनराज पाटील, छोटू गोहील आदी मान्यवर उपस्थित होते.
* राजकीय समीकरणे बदलणार ? :- पाचोरा-भडगावच्या राजकारणात हा प्रवेश म्हणजे खऱ्या अर्थाने 'गेम चेंजर' ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. आता पुढे पाचोरा नगर परिषद निवडणुकीत कोणाची बाजी लागणार? भाजपची भूमिका काय असेल ? पाचोरा - भडगावमध्ये राजकीय तुफान वाढणार, एवढे नक्की!


Social Plugin