Type Here to Get Search Results !

नगरदेवळ्यात ‘शाह एंटरप्रायजेस’चा भव्य शुभारंभ !

* आरोग्य हेच खरे धन : सेवाभावातून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचा संकल्प

नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा परिसराला आधुनिक आरोग्य सुविधांचे नवे दालन लाभणार असून, ‘शाह एंटरप्रायजेस’ चे ग्राम सचिवालय, नगरदेवळा, ता. पाचोरा, जि. जळगाव येथे भव्य उद्घाटन 2 नोव्हेंबर 2025 रोजी रविवारी सकाळी 9.30 वाजता होणार आहे. “आरोग्य हेच खरे धन” या संकल्पनेवर आधारित सेवा उपक्रमाच्या रूपात देत शाह कुटुंबीयांनी ही नवी वाटचाल सुरू केली आहे.


उद्घाटन बशीर शाह रमजान शाह फकीर यांच्या हस्ते होणार असून ग्रामपंचायत सरपंच व सर्व ग्राम पंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, डॉंक्टर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, पत्रकार संघटना, किराणा व्यापारी असोसिएशन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या उपक्रमास एमआर (MR) बंधू, समस्त मित्रपरिवार व ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले आहे.


* शाह एंटरप्रायजेस - आरोग्य सेवेचे नवीन केंद्र :- ग्रामीण भागात वैद्यकीय आणि आरोग्याशी संबंधित सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शाह एंटरप्रायजेसची स्थापना करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांना परवडणाऱ्या दरात आणि त्वरित सेवा देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले. 


* ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण :- उद्घाटन सोहळ्याची बातमी समजताच गावात उत्साहाचे वातावरण असून स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. विशेषतः ग्रामविकासाच्या वाटचालीत अशा उपक्रमांचे महत्व अधोरेखित होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.



Top Post Ad

Below Post Ad

Advertisement