* सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा अनोखा उपक्रम!
* विद्यार्थी, नागरिक आणि पोलिस दल एकत्र येवून देणार ‘अखंड भारत’चा संदेश!
पाचोरा / फिरोज पिंजारी :- लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभर “राष्ट्रीय एकता दिवस” मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने भडगाव व पाचोरा पोलिस स्टेशनतर्फे “Run For Unity” - एक दौड देश की एकता और अखंडता के लिए या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही एकता दौड 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7 वाजता पार पडणार आहे.
* दौडीचा मार्ग व प्रारंभस्थळ :- या देशभक्तीपर एकता दौडची सुरुवात भडगांव बाळद रोड चौफुली, महाराणा प्रताप चौक येथून होणार असून पाचोरा एस. एस. एम. एम. कॉलेज ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि परत कॉलेजपर्यंत असेल. या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पोलिस अधिकारी, सामाजिक संघटना तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या दौडचे आयोजन पाचोरा पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्देश देशातील विविधतेतून एकतेचा संदेश देणे आणि युवकांमध्ये राष्ट्रभावना प्रबळ करणे असा आहे.
* एकता हीच शक्ती - अखंड भारताचा मंत्र :- या उपक्रमाद्वारे विद्यार्थी आणि नागरिकांना राष्ट्रीय एकात्मता, बंधुता आणि सामाजिक सलोखा यांचे महत्त्व पटवून देण्यात येईल. पोलिस प्रशासनाच्या पुढाकाराने होणारा हा उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरेल.
* सर्व विद्यार्थी बांधवांना आवाहन :- सकाळी 7 वाजता ठरलेल्या ठिकाणी वेळेत हजर राहून या राष्ट्रीय एकता धाव स्पर्धेत सहभागी व्हा आणि अखंड भारताच्या संदेशासाठी पाऊल टाका, असे आवाहन करण्यात आले आहे.


Social Plugin