* आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मेळाव्याचे आयोजन
* मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नेत्यांचा जनसंपर्क व संघटनाचा शक्तीप्रदर्शन सोहळा!
पाचोरा / फिरोज पिंजारी :- आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि लोकनियुक्त संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाचोरा – भडगाव विधानसभेत शिवसेना-युवासेना कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या उत्साहात अधिक जोश भरण्यासाठी आणि संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना-युवासेना निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
पाचोरा विधानसभा मतदारसंघात शिवसेना-युवासेना व महिला आघाडीच्या वतीने आयोजित “निर्धार मेळावा” मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या सोहळ्यास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा मेळावा 1 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा येथे होणार आहे.
यावेळी पाचोरा - भडगांव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल पाटील माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, उपनेते शिवसेना जळगाव जिल्हा परिषद सुनील चौधरी, शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब मनोहर पाटील (पाचोरा, भडगांव, चाळीसगाव), वासुदेव पाटील (एरंडोल, पारोळा, अमळनेर), विष्णु भंगाळे (जळगांव, धरणगांव), जळगांव लोकसभा संपर्क प्रमुख भैय्यासाहेब पाटील, उत्तर महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख सरीता माळी, युवतीसेना कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्य डॉं. प्रियंका पाटील, माजी जि. प. सदस्य विकास पाटील, भडगांव माजी नगराध्यक्ष राजेंद्र जिभू पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख जितेंद्र जैन, जळगाव महिला आघाडी जिल्हा प्रमुख ललीता पाटील, शेतकरी सेना जिल्हा प्रमुख सुनिल पाटील, एसटी कामगार सेना जिल्हा प्रमुख, नरेश पाटील, बंजारा सेना जिल्हा प्रमुख आत्माराम राठोड, एकलव्य सेना जिल्हा प्रमुख धर्मा बाविस्कर, भिमशक्ती शिवशक्ती जळगांव जिल्हा प्रमुख प्रविण ब्राम्हणे, युवासेना जळगांव लोकसभा जिल्हा अध्यक्ष लखीचंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती प्रकाश पाटील, युवा नेता सुमित किशोर पाटील, पाचोरा नगर परिषद माजी नगराध्यक्षा सुनिता किशोर पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्यात युवाशक्तीला प्रेरित करण्यासाठी व पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने विशेष संवाद होणार असून शिवसेना आणि युवासेना व महिला आघाडी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा निर्धार या कार्यक्रमातून केला जाणार आहे. शिवसेना - युवासेनेचा हा निर्धार मेळावा फक्त राजकीय कार्यक्रम न राहता, कार्यकर्त्यांच्या एकतेचा, निष्ठेचा आणि विकासाच्या वचनबद्धतेचा उत्सव ठरणार आहे. पाचोरा आणि भडगांव परिसरात या मेळाव्याबद्दल शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


Social Plugin