Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटीचा भव्य गौरव सोहळा जाहीर!

* विशेष कार्य करणाऱ्यांसाठी नामनिर्देशन प्रक्रिया सुरू

* 25 डिसेंबर 2025 मध्ये पुण्यात ऐतिहासिक सन्मान सोहळा

जळगाव / प्रतिनिधी :- महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटीमार्फत समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी भव्य राज्यस्तरीय गौरव सोहळा जाहीर करण्यात आला असून, हा सोहळा 25 डिसेंबर 2025 मध्ये पुणे येथे दिमाखात आयोजित केला जाणार आहे. यासाठी पात्र आणि कार्यकर्तृत्व सिद्ध केलेल्या व्यक्तींच्या नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


या सोहळ्यात महाराष्ट्रातील समाजकार्य, पत्रकारिता, शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक, सामाजिक बांधिलकी आणि इतर विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच बागबान समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या 32 कार्यकर्त्यांना विशेष सन्मान देण्यात येणार आहे.


* नामनिर्देशनासाठी आवाहन :- समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींची माहिती समितीकडे पाठवावी. त्यासाठी व्यक्तीचे नाव व संपर्क क्रमांक, कार्याचे संक्षिप्त वर्णन, उपलब्ध असल्यास संबंधित पुरावे / प्रमाणपत्रे ही माहिती आवश्यक आहे.


* माहिती कुठे पाठवायची ? :- महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटी, जळगाव कार्यालय अथवा संबंधित पदाधिकारी व आयोजक यांच्याकडे नामनिर्देशन पाठवावे.


* मार्गदर्शन व प्रमुख संपर्क :- नामनिर्देशन प्रक्रिया समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉं. शरीफ शफी बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. डॉं. शरीफ बागवान (92092 55786), हाजी शाकिर बागवान सातारा (98225 47068), हाजी मुश्ताक बागवान मोहोळ (91583 17786), नासिर बागवान (9960123796) यांच्याशी संपर्क करावा.


* समितीतील प्रमुख मान्यवर व पदाधिकारी :- उपाध्यक्ष, सचिव, सल्लागार व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील बागबान समाजाचे मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. विविध, जिल्ह्यांतून प्रतिनिधी व समिती सदस्य उपस्थिती दर्शविणार असून हा कार्यक्रम राज्यातील बागबान समाजासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.


निस्वार्थ भावनेने समाजासाठी कार्य करणाऱ्यांचा गौरव करणे, त्यांची प्रेरणादायी कामगिरी पुढील पिढीपुढे ठेवणे आणि समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे हाच या सोहळ्याचा मुख्य हेतू आहे, असे डॉं. शरीफ बागवान यांनी सांगितले.




Top Post Ad

Below Post Ad

Advertisement