Type Here to Get Search Results !

ऋषिकेशमध्ये इन्फ्लुएंसर तनु रावतचा नवा वाद!

* मंदिर परिसरात डान्स ; धार्मिक भावनांना ठेच का ?

* व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संत, संघटनांचा आक्रोश

* 'मंदिरात मनोरंजन नव्हे, श्रद्धा’ - कठोर कारवाईची मागणी

ऋषिकेश (उत्तराखंड )/ प्रतिनिधी :- प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर तनु रावत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ऋषिकेशातील एका प्रसिद्ध मंदिराच्या परिसरात त्यांनी फिल्मी गाण्यावर डान्स केलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धार्मिक व सामाजिक संघटना संतप्त झाल्या आहेत. मंदिरासारख्या पवित्र स्थळी अशा प्रकारे शूटिंग करून हिंदू भावनांचा अपमान झाल्याचा आरोप केला जात आहे.


व्हिडिओ व्हायरल होताच #TanuRawatControversy ट्रेंड होऊ लागला असून अनेकांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. काहींनी हा प्रकार “धार्मिक स्थळाची पवित्रता भंग करणारी कृती” असल्याचे सांगितले.



* पोलिसांची चौकशी सुरू :- या प्रकरणाची गंभीर दखल घेत ऋषिकेश पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शूटिंगसाठी परवानगी घेतली होती का ? मंदिर प्रशासनाची मान्यता होती का ? याचा तपास होणार आहे. नियमभंग आढळल्यास कारवाई होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.



* तनु रावतची सफाई :- विवाद वाढल्यानंतर तनु रावत यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. माझा हेतू धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता. व्हिडिओ फक्त क्रिएटिव्ह शूट होता, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र साधू-संतांनी ही सफाई नाकारली आहे. त्यांच्या मते, मंदिरस्थळे मनोरंजनासाठी नसतात. अशा कृत्यांना कडक शिक्षा करावी.


* समर्थन vs विरोध :- या प्रकरणावर सोशल मीडियात दोन गट स्पष्ट दिसत आहेत. काही जण तनु रावतचा समर्थन करीत “अभिव्यक्ती स्वातंत्र्य” म्हणत आहेत तर अनेकांनी धार्मिक मर्यादा भंग झाल्याचा आरोप करीत कठोर कारवाईची मागणी केली आहे.


ऋषिकेशसारख्या आध्यात्मिक नगरीत मंदिर परिसरात शूट करण्यात आलेल्या या व्हिडिओने श्रद्धा vs सोशल मीडिया ग्लॅमर अशी चर्चा पेटवली आहे. या प्रकरणात पोलिसांची कारवाई आणि प्रशासनाचा पुढील निर्णय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement