मुंबई / प्रतिनिधी :- गुवाहाटी (आसाम) मध्ये सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने दिला जाणारा "अटल भारत गौरव" या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने नाशिकचे भूमिपुत्र डॉं. निलेश राणे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
डॉं. निलेश राणे यांना 'अटल भारत गौरव' राष्ट्रीय पुरस्कार आसाम विधानसभा उपाध्यक्ष नुमल मोमीन, आसाम राज्य आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विजयकुमार गुप्ता आणि बॉलीवूड अभिनेता अली खान यांच्या हस्ते या भव्यदिव्य समारंभात प्रदान करण्यात आला.
डॉं. निलेश राणे यांनी समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने कार्य करतांना युवकांमध्ये क्रीडा संस्कार, कृषी, शिक्षण तसेच आरोग्य जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी यांचा प्रचार-प्रसार केला आहे. त्यांच्या कार्यातून सामाजिक ऐक्य, सकारात्मकता आणि प्रगतीचा संदेश समाजात पोहोचला आहे.
या सन्मानामुळे डॉं. निलेश राणे यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर नवा गौरव प्राप्त झाला असून समाजातील विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Social Plugin