Type Here to Get Search Results !

1996 - 97 च्या बॅचचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात आणि आठवणींच्या वर्षावात

* भावपूर्ण श्रद्धांजली, आठवणींची मैफिल, शिक्षकांचा सन्मान आणि धमाल कार्यक्रमांनी भरलेला दिवस

माळशिरस / अनिल पवार :- हनुमान विद्यालय, शिंदेवाडी येथील 1996 - 97 च्या बॅचचा स्नेहसंमेलन सोहळा अतिशय उत्साहपूर्ण, भावनिक आणि स्नेहाच्या वातावरणात मोठ्या दिमाखात पार पडला. जुन्या आठवणींचा ठेवा, बालपणाचा सुवर्णक्षण आणि जिवलग मित्रांच्या भेटीमुळे संपूर्ण परिसरात आनंदाचा माहौल पसरला होता.


या कार्यक्रमाला एकूण 105 माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी, शिक्षक व माजी शाळा कर्मचारी उपस्थित होते. त्यात 31 विद्यार्थिनी आणि 60 विद्यार्थी सहभागी झाले. सर्वांनी एकमेकांना भेटून शालेय जीवनातील आठवणी उजाळल्या आणि "मैत्री तोडायची नाही, फक्त अधिक घट्ट करायची" असा नवा संकल्प केला.


* भावपूर्ण श्रद्धांजलीने सुरुवात :- कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत भावनिक क्षणाने झाली. सोहळ्याची सुरूवात 12 सहपाठी आणि 4 शिक्षकांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. उपस्थितांच्या डोळ्यात पाणी तर आठवणींनी मन ताजेतवाने झाले.



* स्वेच्छेच्या देणगीतून बॅचचा एकदिलाने सहभाग :- सर्वांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे आर्थिक मदत जमा केली. यात पुष्पगंधा भगत, प्रशांत रुपनवर, प्रमोद शिंदे आणि कमलेश निंबाळकर यांचे विशेष योगदान राहिले.


* गुरुजनांचे स्मरण आणि सन्मान :- कार्यक्रमात माजी आणि विद्यमान शिक्षकांनी हजेरी लावली. त्यामध्ये नलवडे सर, नलवडे मॅडम, एस. टी. रुपनवर सर, बनसोडे सर, कांबळे मामा, वाघमोडे सर तसेच प्रभारी मुख्याध्यापिका मिताली देठे मॅडम यांचा समावेश होता. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल अभिमान व्यक्त करीत मनोगत मांडले आणि मार्गदर्शन केले. शिक्षकांचा सन्मान स्मृतीचिन्ह व भेटवस्तूंनी करण्यात आला.


* आम्ही कोण आहोत ? :- प्रत्येक विद्यार्थ्याने आपली ओळख, कार्यक्षेत्र आणि जीवनप्रवास मांडला. आज या बॅचमधील अनेक जण क्लास वन अधिकारी, डॉंक्टर, इंजिनिअर, शिक्षक, प्राध्यापक, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सोसायटी चेअरमन असे विविध क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करून समाजात आदर्श निर्माण करत आहेत.


* मनोरंजनाचा जल्लोष :- कार्यक्रमात संगीत खुर्ची स्पर्धा, फन गेम्स, आठवणी आणि विनोद यांनी वातावरण रंगून गेले. सचिन महाराज देशमुख यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन करून उपस्थितांना हसवले. कमलेश निंबाळकर यांच्या निवडक गाण्यांनी कार्यक्रमाला नवी झळाळी दिली.


* स्मृतीचिन्ह वितरण :- शेवटी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना विशेष स्मृतीचिन्हे प्रदान करण्यात आली. मैत्रीचा, भावनांचा आणि शाळेच्या प्रेमाचा हा सोहळा स्मरणात राहील असा ठरला. मेजर सागर पाटील, डॉं. नवाज शेख, कमलेश निंबाळकर यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनंजय रुपनवर, किरण शिंदे, डॉ. नवाज शेख, मेजर सागर पाटील, कैलास शेडगे, नितीन अंधारे, कमलेश निंबाळकर, पिंटू भगत, विकास गायकवाड, बापू साबळे, धनु रोकडे, पिनू कदम, महादेव साळुंखे यांचे विशेष सहकार्य लाभले.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement