Type Here to Get Search Results !

कोकण रत्न पुरस्कार 2025 जाहीर

* घुरुपकोंड शाळेच्या मुख्याध्यापिका व सृष्टी प्रतिष्ठानच्या संस्थापिका स्मिता अमर जोष्टे (नवघरे) यांना सन्मान

* शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल - स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचा गौरव उपक्रम

खालापूर / प्रतिनिधी :- स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे ‘कोकण रत्न’ पदवी पुरस्कार २०२५ जाहीर करण्यात आला असून, या वर्षीचा हा प्रतिष्ठेचा सन्मान घुरुपकोंड शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सृष्टी प्रतिष्ठानच्या संस्थापिका स्मिता अमर जोष्टे (नवघरे) यांना प्रदान करण्यात येणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांची उत्तम कामगिरी, समाजाभिमुख दृष्टिकोन आणि स्त्री सक्षमीकरणासाठी केलेले उल्लेखनीय कार्य यांची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

स्मिता जोष्टे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरण, किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन व सॅनिटरी पॅड वाटप, नाटिका लेखन, रांगोळी, चित्रकला, काव्य लेखन आणि शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन तसेच शिक्षकांसाठी मार्गदर्शक तज्ज्ञ म्हणून काम करीत शिक्षण आणि समाजसेवा यांचा उत्तम संगम साधला आहे. त्यांच्या कार्यातून गावागावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा, गरीब आणि आदिवासी मुलांना प्रोत्साहन तसेच समाजात सकारात्मक बदल घडविण्याची चळवळ उभी राहिली आहे.


‘कोकण रत्न’ पुरस्कार प्रदान करणाऱ्या स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे, प्रमुख पाहुणे वरिष्ठ पत्रकार सचिन कळझुनकर, तसेच पदाधिकारी धनंजय कुवडेकर (मुंबई अध्यक्ष), राजेंद्र सुर्वे (खजिनदार), सुभाष राणे (नेते) आणि दिलीप लाड (मुख्य सल्लागार) यांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.


या सन्मानानंतर स्मिता जोष्टे यांनी भावनिक शब्दांत प्रतिक्रिया दिली. हा सन्मान माझ्या वैयक्तिक कार्याचा नसून, सृष्टी प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांचा, विद्यार्थ्यांचा आणि समाजातील सर्व घटकांचा आहे. शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे साधन आहे, आणि त्या माध्यमातून प्रत्येक मुलापर्यंत पोहोचणे हेच माझे ध्येय आहे, असे त्या म्हणाल्या.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement