* एकता कपूर आणि सलमान खानचे मानले आभार
* उडारियां ते नागिन - प्रियंकाचा ग्लॅमरस प्रवास
* नव्या सीझनमध्ये दिसणार दुहेरी नागिनांचा संघर्ष
मुंबई / प्रतिनिधी :- टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री प्रियंका चाहर चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'उडारियां' मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी ही अभिनेत्री आता ‘नागिन 7’ मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. बिग बॉसच्या विशेष भागात एकता कपूर यांनी प्रियंकाचे नाव अधिकृतपणे जाहीर केले. यानंतर चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
* प्रियंका बनली ‘नवी नागिन’ :- सुपरहिट सिरीज नागिनच्या या नव्या पर्वात प्रियंका लीड रोलमध्ये दिसणार आहे. एकता कपूर यांच्या Balaji Telefilms निर्मित या मालिकेतील तिचा लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हिरव्या पोशाखात आणि नागिन अवतारात ती अत्यंत मोहक दिसत असून, तिचा गेटअप प्रेक्षकांना भावला आहे.
प्रियंकाने सांगितले की, नागिनसारख्या सुपरहिट फ्रेंचायझीचा भाग होणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. यासाठी मी माझे वजन कमी केले आणि शारीरिक फिटनेसवर विशेष मेहनत घेतली. या संधीसाठी मी एकता कपूर मॅडम आणि सलमान खान सर यांची मनापासून आभारी आहे.
* उडारियां ते नागिन - स्टारडमचा प्रवास :- प्रियंका चाहर चौधरीने उडारियां मालिकेतून घराघरात लोकप्रियता मिळवली आणि नंतर बिग बॉस 16 मध्ये सहभाग घेत तिचा स्टारडम अधिक वाढला. सतत यशस्वी प्रकल्पांमध्ये झळकणारी प्रियंका आज टीव्ही इंडस्ट्रीतील एक मोठे नाव बनली आहे. 'नागिन 7’ मध्ये तिच्या करिअरला आणखी एक नवा आयाम मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
* यावेळी दोन नागिनांचा थरार :- नवीन सीझनबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ‘नागिन 7’ मध्ये दोन नागिनांचा संघर्ष दाखविला जाणार आहे. कथा “अच्छाई आणि वाईट” यांच्या संघर्षावर आधारित असेल. प्रियंकाच्या विरुद्ध भूमिका कोण साकारणार याची अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र चर्चेनुसार ईशा सिंह आणि नमिक पॉल यांचा विचार केला जात आहे.
* लवकरच कलर्स टीव्हीवर ‘नागिन 7’ :- Balaji Telefilms निर्मित ‘नागिन 7’ लवकरच कलर्स टीव्हीवर प्रक्षेपित होणार आहे. प्रियंकाच्या फॅन्ससाठी ही खऱ्या अर्थाने आनंदाची बातमी आहे. ती आता फक्त ‘उडारियां’ची नायिका नाही, तर संपूर्ण टीव्ही विश्वातील ‘नवी नागिन’ बनली आहे.


Post a Comment
0 Comments