Type Here to Get Search Results !

सुनंदा मांडगे यांची भूमी किसान जनता पार्टीच्या राष्ट्रीय सहकार मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती

नाशिक / प्रतिनिधी :- भूमी किसान जनता पार्टीच्या कार्यात नवी ऊर्जासंचार घडविणारा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संतोष मेश्राम यांच्या आदेशानुसार पक्षाचे सांस्कृतिक मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष व मुंबई कार्याध्यक्ष विक्रम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुनंदा मांडगे यांची भूमी किसान जनता पार्टीच्या राष्ट्रीय सहकार मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.


या निवडीच्या वेळी पक्षाचे अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. त्यात सांस्कृतिक मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष दीपक निकम, राष्ट्रीय सचिव हेमंतकुमार कुलकर्णी, नाशिक जिल्हा अध्यक्ष मोहन सौदागर, सदस्य अण्णा हिंगमीरे, राष्ट्रीय जनसंपर्क प्रतिनिधी मंदा पवार तसेच महाराष्ट्र सचिव (महिला आघाडी) प्रमिला चव्हाण यांचा सक्रिय सहभाग होता.


या बैठकीत पक्ष संघटनेच्या बळकटीकरणासोबतच महिला सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला. सुनंदा मांडगे यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात महिलांच्या हक्कांसाठी आणि समाजहिताच्या कार्यासाठी ठोस पावले उचलण्याचे ठरले आहे.


* महिला मेळावा आणि अन्नदान उपक्रम :- पक्षाच्या सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून लवकरच एक भव्य महिला मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्याचे प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शक विक्रम गायकवाड, राष्ट्रीय जनसंपर्क प्रतिनिधी मंदाताई पवार, महाराष्ट्र अध्यक्ष दीपक निकम, राष्ट्रीय सल्लागार राजन गायकवाड आणि सहकार मोर्चा प्रमुख सुनंदा मांडगे यांची उपस्थिती लाभणार आहे.


याशिवाय डॉं. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त (4, 5 आणि 6 डिसेंबर 2025) रेल्वे स्टेशन परिसरात अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे भाविक व गरजू नागरिकांना मोफत भोजन देण्यात येणार आहे. पक्षाने सर्व भाविकांना या सेवायज्ञात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


भूमी किसान जनता पार्टीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना नवी दिशा देत सुनंदा मांडगे यांच्या नेतृत्वाखाली सहकार मोर्चा अधिक प्रभावीपणे कार्यरत होईल, असा विश्वास पक्षश्रेष्ठींकडून व्यक्त करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement