Type Here to Get Search Results !

'मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा’ अभियानाला शिंदेवाडीत दिमाखदार सुरुवात

* स्वच्छता मोहिम, देणगीस प्रतिसाद आणि ग्रामएकजूट

* अभियानासाठी 1.01 लाखांची देणगी जमा – 10 ते 13 लाखांच्या कामासाठी आणखी सहकार्याचे आवाहन

शिंदेवाडी (ता. माळशिरस) / अनिल पवार :- महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा’ (2025-26, टप्पा क्र. 3) या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ शिंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उत्साहात पार पडला.

या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी, केंद्र प्रमुख सिद्धेश्वर भरते, युवा उद्योजक संदीप वाघ आणि प्रशांत सरुडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये या अभियानाबद्दल प्रचंड उत्साह दिसून आला.

* स्वच्छतेने झाला अभियानाचा शुभारंभ :- अभियानाची सुरुवात शाळेच्या परिसरातील स्वच्छता मोहिमेने करण्यात आली. 'सेवा हीच खरी साधना’ या भावनेने आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यकर्त्यांनी दोन ते तीन तास मनापासून श्रमदान करीत संपूर्ण शाळा परिसर स्वच्छ व आकर्षक बनविला. काम पूर्ण झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.


* गावकऱ्यांची उत्स्फूर्त देणगी :- अभियानाच्या पुढील कामांसाठी ग्रामस्थांनी मोठ्या मनाने आर्थिक मदत दिली.

जमा झालेल्या देणग्या : 1,01,000 रुपये

संदीप वाघ (धर्मपुरी) - 50,000

नितीन मगर सर - 21,000

तानाजीराव देशमुख - 10,000

शांतीलाल जैन - 5,000

संदीप वाघ (धर्मपुरी) - 5,000

अभिजीत देशमुख - 5,000

राहुल लिंबोरे - 5,000 हे देणगीदार प्रभागाच्या शैक्षणिक विकासासाठी महत्त्वाचा हातभार लावत असल्याने ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून कौतुक केले.


* 10–12 लाख खर्चाचा अंदाज :- अभियानांतर्गत होणाऱ्या शाळेविकास कामांचा खर्च अंदाजे 10 ते 12 लाख रुपये असेल. 3 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025 या मर्यादित कालावधीत काम पूर्ण करण्यासाठी अधिक सहकार्याची आवश्यकता असल्याचे व्यवस्थापन समितीने स्पष्ट केले. पालक मिटिंगमध्ये जाहीर केलेल्या देणगीत लवकरच भर टाकण्याचे आवाहनही करण्यात आले.


* शाळेचे मनःपूर्वक आभारप्रकटन :- मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समितीने देणगीदार, श्रमदान करणारे कार्यकर्ते, ग्रामस्थ व पालक सर्वांचे मनापासून आभार मानले. त्यांच्या सहकार्यामुळे शिंदेवाडीची शाळा ‘सुंदर शाळा’ म्हणून विकसित होण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे.


* गावाची एकदिलाने साथ – ‘सुंदर शाळा’ची उत्सुकता वाढली :- या अभियानामुळे संपूर्ण गाव एकत्र येऊन शाळा विकासासाठी सक्रियपणे उभे राहिले आहे. आगामी काळात शाळेचा बदललेला चेहरा पाहण्याची विद्यार्थ्यांना, पालकांना आणि ग्रामस्थांना उत्सुकता लागली आहे.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement