* विकासकामांचा आढावा, नियोजनाला गती
* तुषार कांबळे व अशोक लोखंडे यांची संयुक्त पाहणी
पुणे / प्रतिनिधी :- संगमवाडीतील आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे समाधीस्थळावर आज जयंतीपूर्व तयारीसाठी महत्वाची बैठक व प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. 14 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जयंती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांची माहिती, पुढील आराखडा आणि कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा यावर सविस्तर चर्चा झाली.
या भेटीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेडचे महाराष्ट्र सचिव आणि तरुण नेतृत्वाचे प्रतिनिधी तुषार तानाजी कांबळे उपस्थित होते. त्यांनी समाधीस्थळ परिसरातील कामांची पाहणी करीत समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे यांच्यासोबत नियोजनाचा आढावा घेतला.
तुषार कांबळे यांनी स्थळाच्या रचना, स्वच्छता, सौंदर्यीकरण, भावी सुविधा आणि देखभाल यासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यांनी कामाचा दर्जा आणि गती कायम ठेवण्याचे निर्देश देत प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यावर भर दिला.
* प्रकल्प व्यवस्थापनाची सविस्तर माहिती :- प्रोजेक्ट मॅनेजर चौगुले यांनी कामाची सद्य प्रगती, तांत्रिक बाबी आणि पुढील टप्प्यांची माहिती दिली. समिती व स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून कार्य गतिमान होत आहे.
* इतिहास, स्वाभिमान आणि संस्कारांची प्रेरणा :- अध्यक्ष अशोक लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली समाधीस्थळाच्या उभारणीसाठी अनेक वर्षांपासून महत्वपूर्ण कार्य केले जात आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे हे ऐतिहासिक स्थळ शिस्तबद्ध, विकासमुखी आणि समाजजागृतीचे केंद्र म्हणून विकसित होत आहे.
* समाजाच्या संगठित योगदानावर भर :- बैठकीत स्वच्छता मोहीम, प्रकाशयोजना, सांस्कृतिक कार्यक्रम, सुरक्षा आणि स्थानिक युवकांच्या सक्रिय सहभागाची महत्वाची चर्चा झाली. या भेटीवेळी कैलास कांबळे, बबलू उपाध्याय, राजू आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.
तुषार कांबळे म्हणाले की, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे आत्मसन्मान, संघर्ष आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक आहेत. हे स्थळ फक्त समाधी नाही, तर आपल्या इतिहासाचा अभिमान आणि प्रेरणा आहे. त्याचे आधुनिकीकरण हे आपले कर्तव्य आहे.
* नेतृत्वाचे संयुक्त आवाहन :- अशोक लोखंडे आणि तुषार कांबळे म्हणाले की, 14 नोव्हेंबर रोजी जयंतीनिमित्त संगमवाडी येथील समाधीस्थळी उपस्थित राहून क्रांतिगुरूंच्या विचारांना सलाम करावा. समाजातील सर्व बांधवांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन ऐतिहासिक परंपरेला सन्मान द्यावा.
* भव्य, अनुशासित आणि प्रेरणादायी जयंती उत्सव :- या भेटीमुळे जयंती सोहळा अधिक दृढ, प्रभावी आणि प्रेरणादायी स्वरूपात पार पडेल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. समाजाच्या एकतेचा, स्वाभिमानाचा आणि इतिहास जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात येणार आहे.


Social Plugin