* जळगाव जिल्हा पश्चिम निवडणूक प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल आशिष महाजन यांच्याकडून सत्कार
नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा येथे पारंपरिक श्रद्धा आणि उत्साहात साजरा करण्यात आलेल्या बालाजी रथयात्रा उत्सवाला चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी विशेष सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार चव्हाण यांनी बालाजी महाराजांचे दर्शन घेतले तसेच गावातील मान्यवर आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी 7 मित्रांची फर्निचर दुकानाचे मालक तथा सामाजिक कार्यकर्ते आशिष महाजन ऊर्फ बंटी यांनी आमदार मंगेश चव्हाण यांचा जळगाव जिल्हा पश्चिम निवडणूक प्रमुख म्हणून झालेल्या नियुक्तीबद्दल सत्कार केला.
आमदार चव्हाण यांनी आपल्या साध्या आणि आत्मीयतेच्या स्वभावातून उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांनी रथयात्रा उत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समितीचे कौतुक केले आणि भविष्यातील सामाजिक, धार्मिक उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी आमदार चव्हाण यांनी आशिष महाजन यांच्या मुलाला गिफ्ट म्हणून कॅडबरी देत प्रेमळ आशीर्वाद दिला. या छोट्या परंतु आत्मीय प्रसंगामुळे उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. सत्कार प्रसंगी स्थानिक पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, रथोत्सव समितीचे कार्यकर्ते, पत्रकार तसेच नगरदेवळा व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments