* महापालिका विजयासाठी बविआ सज्ज - कार्यकर्त्यांना नवचैतन्य देण्यासाठी ठाकर कुटुंबियांचे मार्गदर्शन
वसई / नरेंद्र पाटील :- विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर निर्माण झालेली मरगळ झटकून आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडी (बविआ) नव्या जोमाने सज्ज झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशाने ठिकठिकाणी कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून शनिवार, दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी नालासोपारा येथील के. एम. पी. डी. शाळेत संध्याकाळी ५ वाजता बविआचा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यासाठी लोकनेते हितेंद्र ठाकूर, माजी आमदार क्षितिज ठाकूर, प्रथम महापौर राजीव पाटील, प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर, माजी महापौर रूपेश जाधव, माजी उपमहापौर उमेश नाईक यांच्यासह बविआचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असून ते कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी मार्गदर्शन करणार आहेत.
माजी सभापती निलेश देशमुख यांनी सर्व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून, या मेळाव्यातून बविआच्या निवडणूक रणसज्जतेचा औपचारिक शुभारंभ होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
वसई-विरार महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, पक्षात नव्या उर्जेचा संचार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Post a Comment
0 Comments