Type Here to Get Search Results !

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी

* भडगावात पोस्को कायद्यान्वये तरुणावर गुन्हा दाखल

भडगाव / प्रतिनिधी :- भडगाव शहरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणून तिचे अश्लील फोटो मोबाईलमध्ये टिपून “हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीन” अशी धमकी देवून ब्लॅकमेल करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणावर पोस्को (POCSO) कायदा आणि भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित तरुण दिनेश राजू माळी हा काही महिन्यांपूर्वी त्या मुलीच्या संपर्कात आला होता. सुरुवातीला त्याने प्रेमसंबंधाचे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. नकार दिल्यानंतर त्याने तिच्या इच्छेविरुद्ध अश्लील फोटो काढले आणि ते प्रसारित करण्याची धमकी दिली.


घाबरलेल्या पीडित मुलीने अखेर पालकांना सर्व सांगितले. पालकांनी तत्काळ भडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मी करंकार या करीत आहेत.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement