* वीज बिलावरील नाव बदल आता फक्त 3 ते 7 दिवसांत ; ऑनलाइन प्रक्रियेला स्वयंचलित मंजुरी
* अर्ज, कागदपत्रे आणि फी भरण्याची सोय घरबसल्या ; महिनाभर लागणारे काम आता आठवड्याच्या आत पूर्ण
मुंबई / प्रतिनिधी :- राज्यातील वीज ग्राहकांसाठी महावितरणने मोठा आणि ग्राहकाभिमुख निर्णय घेतला आहे. वीज बिलावरील ग्राहक नाव बदलण्याची प्रक्रिया आता फक्त 3 ते 7 दिवसांत पूर्ण होणार आहे. यापूर्वी ही प्रक्रिया एक महिन्यापर्यंत चालायची, मात्र आता संपूर्ण प्रणाली स्वयंचलित (Automated Approval System) करण्यात आली असून मानवी हस्तक्षेपाशिवाय मंजुरी दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांच्या निर्देशानंतर महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी हा निर्णय लागू केला आहे. नव्याने विकसित केलेल्या ऑनलाइन प्रणालीद्वारे आता ग्राहकांना घरबसल्या ही सेवा मिळणार आहे, ज्यामुळे वेळ, श्रम आणि कार्यालयीन चकरा या सर्वांचा मोठ्या प्रमाणात बचाव होणार आहे.
* ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया कशी कराल ? :- ग्राहकांनी महावितरणचे मोबाईल ॲप किंवा अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in यावर लॉगिन करावे.
"नाव बदल" (Change of Name) हा पर्याय निवडून ऑनलाइन अर्ज सादर करता येईल.
आवश्यक कागदपत्रे (मालकी हक्काचा पुरावा, ओळखपत्र इ.) अपलोड करावीत.
प्रोसेसिंग फी (Processing Fee) भरून अर्ज सबमिट करावा.
त्यानंतर स्वयंचलित प्रणालीकडून अर्जाची छाननी आणि मंजुरी केली जाईल.
* फायदे ग्राहकांसाठी :- महिनाभर लागणारे काम आता फक्त 3 ते 7 दिवसांत पूर्ण.
कोणतीही मानवी प्रक्रिया नाही - मंजुरी स्वयंचलित.
घरबसल्या अर्ज, फी आणि कागदपत्र अपलोडची सुविधा.
वेळ आणि कागदोपत्री त्रासातून मुक्तता.
महावितरणचा उद्देश स्पष्ट आहे की, ग्राहकांना तत्पर आणि पारदर्शक सेवा मिळावी. ग्राहक नाव बदलाच्या प्रक्रियेत स्वयंचलित मंजुरी देण्याचा हा निर्णय त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे ग्राहकांना अनावश्यक प्रतीक्षा करावी लागणार नाही आणि त्यांची कामे वेळेत, सोप्या आणि डिजिटल पद्धतीने पूर्ण होतील.


Post a Comment
0 Comments