* प्रतिभा मांडगे यांची सहकार मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड
* महिला शेतकऱ्यांसाठी लवकरच मेळावा व अन्नदान उपक्रम
नाशिक / फिरोज पिंजारी :- भूमी किसान जनता पार्टीच्या संघटनात्मक कार्यात नवचैतन्य आणणारी महत्वपूर्ण नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पक्ष संस्थापक अध्यक्ष संतोष मेश्राम यांच्या आदेशानुसार आणि सांस्कृतिक मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विक्रम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, जनसंपर्क प्रतिनिधी मंदाताई पवार यांच्या हस्ते राष्ट्रीय सहकार मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून प्रतिभा मांडगे यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय सचिव प्रतिभा चव्हाण, महाराष्ट्र अध्यक्ष दीपक निकम, राष्ट्रीय सल्लागार राजन गायकवाड, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मोहन सौदागर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. निवड झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष संतोष मेश्राम आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी प्रतिभा मांडगे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी नवीन राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रतिभा मांडगे यांनी सांगितले की, लवकरच महिला शेतकरी मेळावा आयोजित करण्यात येणार असून, ग्रामीण महिलांना शेती व सहकार क्षेत्रातील स्वावलंबनाकडे प्रवृत्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले जाईल. त्याचबरोबर राष्ट्रीय सहकार मोर्चा अध्यक्षा सुनंदा मांडगे यांनी महिला शेतकऱ्यांसाठी सहकार क्षेत्रातील व्यवसायिक मार्गदर्शन दिले.
कार्यक्रमादरम्यान जाहीर करण्यात आले की, 4, 5 आणि 6 डिसेंबर रोजी डॉं. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे स्टेशन परिसरात “अन्नदान उपक्रम” राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची घोषणा होताच उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करून समर्थन दिले.
जनसंपर्क प्रतिनिधी मंदाताई पवार यांनी यावेळी पक्षाची भूमिका स्पष्ट करीत सर्वांना आवाहन केले की, भूमी किसान जनता पार्टीचे सदस्यत्व वाढवा आणि पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करा. भूमी किसान जनता पार्टी जिंदाबाद!...संतोष जी मेश्राम साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है!...विक्रम गायकवाड आगे बढो, हम तुम्हारे साथ है! ...जय संविधान! जय भीम! जय शिवराय!” या घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले आणि कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.


Post a Comment
0 Comments