Type Here to Get Search Results !

माजी सभापती अब्दुल हक पटेल यांचे दुःखद निधन

वसई / प्रतिनिधी :- वसई विरार महानगरपालिकेचे माजी सभापती तसेच बहुजन विकास आघाडीचे वसई पूर्व पट्टीचे नेते अब्दुल हक पटेल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. वसई पूर्व गोखिवरे रेंज ऑफिस येथील पूर्वापार राहणारे अब्दुल हक पटेल "अब्दुल चाचा" नावाने प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

काही वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी ते पुण्याला गेले होते. चाचण्या झाल्यानंतर बुधवार, 5 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेत माजी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी खासदार बळीराम जाधव, माजी महापौर नारायण मानकर, प्रवीण शेट्टी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काशीनाथ पाटील, माजी नगराध्यक्ष नितीन राऊत, उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स, माजी सभापती उमा पाटील, माजी नगरसेवक सागर महांबरे, माजी नगरसेवक संदेश जाधव, पंकज पाटील, किशोर धुमाळ, हबीब शेठ, विल्सन फरगोज, माजी महापौर रुपेश जाधव आदी उपस्थित होते. त्यांचावर रात्री 10 वाजता पेल्हार येथील कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement