Type Here to Get Search Results !

खोपोलीत शिवसेनेच्या विजयाचे शिल्पकार ?

* नगराध्यक्ष पदासाठी कुलदिपक शेंडे तर डॉं. शेखर जांभळे यांची प्रचार प्रमुख म्हणून नेमणूक

* आ. महेंद्र थोरवे यांच्या ‘रणनितीच्या खेळी’ला सुरुवात

खोपोली / फिरोज पिंजारी :- खोपोली नगर परिषदेवर पुन्हा एकदा भगवा फडकविण्याचा निर्धार करून शिवसेना सज्ज झाली आहे. विधानसभा निवडणुकीत खोपोलीकरांनी आमदार महेंद्र थोरवे यांना दिलेला अभूतपूर्व पाठिंबा लक्षात घेतला तर आगामी नगर परिषदही शिवसेनेच्या झोळीत जाणारच, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.


आमदार महेंद्र थोरवे हे राजकीय बुद्धीबळातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. योग्य वेळी योग्य पत्ते टाकत ते पक्षाला लाभदायी निर्णय घेत असल्याचे पक्षांतर्गत आणि विरोधक सुद्धा मान्य करतात. खोपोलीमध्ये एक एक पाऊल टाकत शिवसेनेची विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचे दृश्य आता स्पष्टपणे दिसत आहे.


* कुलदीपक शेंडे ते डॉं. जांभळे - विजयाची ‘जोडी’ तयार :- नगराध्यक्षपदासाठी कुलदीपक शेंडे यांच्या नावाची घोषणा करून बंडखोरी शांत करण्यात आमदार थोरवे यशस्वी ठरले होते. आता पुढील चाल म्हणून नामांकित समाजसेवक आणि संघटन कुशल डॉं. शेखर जांभळे यांची शिवसेनेच्या खोपोली प्रचार प्रमुखपदी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.


डॉं. जांभळे हे मॅनेजमेंट आणि रणनिती यासाठी ओळखले जातात. आधी लोकसभा, नंतर विधानसभा निवडणुकीत त्यांच्या संकल्पनांनी आणि प्रचारशैलीने मतदारांना आकर्षित केले होते. आ. थोरवे यांच्या रणनीतीस साथ आणि जांभळे यांच्या कल्पक प्रचारामुळे शिवसेनेचा जनसमर्थनाचा आलेख उंचावल्याचे शहरात बोलले जाते.


* ‘जमिनीवरचा नेता’ व ‘बुद्धीबळाचा खेळाडू’ अशी जोडी :- खोपोली शहरात जांभळे यांच्या संपर्कजाळ्याला आणि विश्वासाला मोठी दाद आहे. त्यांची नम्रता, समन्वय कौशल्य आणि नवीन कल्पना यामुळे पक्षात उत्साह निर्माण झाला आहे. आता शिवसेनेचे उद्दिष्ट स्पष्ट आहे की, प्रभागनिहाय संघटनबांधणी...जास्तीत जास्त उमेदवारांची सांगड...स्थानिक प्रश्नांवर आक्रमक मोहीम...मतदारांच्या भावना आणि अपेक्षांना जोडणारी रणनीती या सगळ्यामुळे आगामी नगर परिषद निवडणूक शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ‘खोपोलीत भगवा फडकणारच’ असा आत्मविश्वास आता शिवसैनिकांमध्ये दिसत आहे.


* शेवटचा डाव विजयाचाच ? :- राजकीय पातळीवर ‘कोणाला कोणती जबाबदारी द्यायची आणि त्याचा पक्षाला किती फायदा होईल’ याचा आ. थोरवे यांचा अभ्यास अचूक असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यात डॉं. शेखर जांभळे यांचा प्रचार प्रमुख म्हणून समावेश झाल्याने शिवसेनेत नवचैतन्य संचारले आहे. खोपोली नगर परिषद निवडणुकीचा रंग आता तापायला सुरुवात झाली आहे आणि शिवसेना एकेक पाऊल विजयाकडे टाकत असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement