* कुंभमेळा नियोजन, नवीन पदाधिकारी निवड आणि मित्रपक्षांसोबत चर्चा
* संस्थापक अध्यक्ष संतोष मेश्राम यांच्या आदेशाने निर्णय प्रक्रिया सुरू
* नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील महिला - पुरुष पदाधिकाऱ्यांची निवड
नाशिक / फिरोज पिंजारी :- भूमी किसान जनता पार्टी सांस्कृतिक मोर्चातर्फे नाशिक येथे महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक आयोजित करण्यात आली आहे. पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संतोष मेश्राम यांच्या आदेशानुसार ही बैठक पार पडणार असून, नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसह आगामी कुंभमेळ्यातील समस्यांवर तोडगा निघण्यासाठी ही चर्चा होणार आहे.
या बैठकीत नाशिक, छ. संभाजीनगर (औरंगाबाद), अहिल्यानगर, पुणे, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतील नव्या सभासदांना पक्षात सामावून घेत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. तसेच आगामी नगर परिषद व महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकटीकरणावर चर्चा होईल.
कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणावर महिला - पुरुष व्यावसायिक सहभागी होतात. त्यांना व्यवसायासाठी जागा कशा मिळतील, यासंदर्भात विशेष रणनीती या बैठकीत निश्चित केली जाईल. व्यावसायिकांना योग्य अधिकार, सुविधा आणि पारदर्शक प्रक्रिया मिळवून देण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न केले जातील, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
बैठकीला राष्ट्रीय उपाध्यक्ष विक्रम गायकवाड, राष्ट्रीय जनसंपर्क प्रतिनिधी मंदा पवार, महाराष्ट्र अध्यक्ष दिपक निकम, राष्ट्रीय सल्लागार राजन गायकवाड, महिला सचिव प्रमिला चव्हाण, महाराष्ट्र सहकार मोर्चा पदाधिकारी सुनंदा मांडगे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मोहन सौदागर तसेच अन्य अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि नवीन सदस्य उपस्थित राहणार आहेत.
4 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 ते 4 वाजता हरीआली हॉटेल, नाशिक रोड येथे ही बैठक होणार आहे. किसान, कामगार, महिला आणि युवकांच्या प्रश्नांवर सकारात्मक, रचनात्मक राजकारण करीत संघटन अधिक मजबूत करणे, हा बैठकीचा मुख्य उद्देश आहे. ही राज्यातील महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक असून पक्षाची भविष्यातील राजकीय रणनीती ही बैठक दिशा देईल, अशी माहिती पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आली.


Social Plugin