Type Here to Get Search Results !

भडगावची जनता विकासाच्या पाठीशी - नगर परिषदेत शिवसेनेचाच झेंडा फडकेल : आमदार किशोर आप्पा पाटील

* एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने भडगावचा चेहरामोहरा बदलला 

भडगाव / फिरोज पिंजारी :- भडगाव नगर परिषद निवडणुकीचा प्रचार आजपासून जोरात सुरू झाला असून शिवसेनेच्या प्रचार मोहिमेला नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या निमित्ताने श्रीराम मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पक्ष कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधत विकासाच्या मार्गांवर भडगावला नेण्याचा निर्धार व्यक्त केला.


आमदार पाटील म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशिर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली भडगाव शहरात अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, प्रकाशयोजना, पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रांमध्ये भडगावने वेगाने प्रगती साधली आहे. आगामी काळातही या विकासाची गती आणखी वाढेल आणि भडगावचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलेल.


तसेच त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, भडगावची जनता विकासाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. त्यामुळे या नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील आणि नगर परिषदेत शिवसेनेचाच झेंडा फडकेल.


त्यांनी जनतेला सावध करताना असेही नमूद केले की, निवडणुकीच्या काहीच दिवसांपूर्वी काही जण दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. मात्र, भडगावची जागरूक जनता खऱ्या विकासाचा विचार करून नगर पालिकेची सत्ता शिवसेनेच्या हाती देईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.


शिवसेनेच्या प्रचार मोहीमेच्या शुभारंभानंतर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत मोठा उत्साह दाखविला. नागरिकांमध्ये देखील पक्षाच्या नेतृत्वावरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळाले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement