Type Here to Get Search Results !

आयुष्यभर सोसायटीची निष्ठेने सेवा करणारे ‘ गोरख बाप्पू’ यांचे निधन

* नगरदेवळा दिगर विविध सेवा सहकारी सोसायटीचे वरिष्ठ हिशोबनीस कै. गोरख गोविंदा महाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली

नगरदेवळा / प्रतिनिधी :- दिगर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी नगरदेवळा यांचे वरिष्ठ अकाउंटंट (हिशेबनीस) कै. गोरख गोविंदा महाले यांच्या निधनाने सोसायटीसह संपूर्ण नगरदेवळा ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आयुष्यभर सोसायटीसाठी प्रामाणिक, निष्ठावान आणि सतत कार्यरत राहिलेले बाप्पू आता आपल्यात नाहीत, ही अतिशय वेदनादायी बाब आहे.

बाप्पू यांनी आपल्या कार्यकाळात संपूर्ण आयुष्य सोसायटीच्या सेवेकरीता अर्पण केले. निवृत्तीनंतरही त्यांनी सोसायटीपासून दूर न जाता त्याच समर्पणाने आपले योगदान दिले. अंदाजे 2600 सभासदांना नावानिशी ओळखणारे, दफ्तर न पाहता सभासदांचे देणे-घेणे त्वरित सांगणारे, नेहमी संयमी, आदरयुक्त, साधे व प्रेमळ बोलणारे, त्यांच्या जाण्याने सोसायटीने एक कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि अनुभवी सेवेकरी गमावला आहे.


सभासद असो वा कर्मचारी - प्रत्येकाशी त्यांनी समान आदराने वागणूक दिली. त्यांच्या शांत स्वभावामुळे, सूक्ष्म आर्थिक व्यवहारांवरील पकडीमुळे आणि प्रचंड कार्यकौशल्यामुळे बाप्पू यांचे स्थान सर्वांमध्ये अत्यंत मानाचे होते. त्यामुळे त्यांचे निधन ही सोसायटीसाठीच नव्हे तर नगरदेवळा ग्रामस्थांसाठीही मोठी हानी आहे.


कै. बाप्पू महाले यांच्या निधनाबद्दल नगरदेवळा दिगर विविध कार्यकारी सोसायटी, नगरदेवळा ग्रामस्थ, महाले कुटुंब, कुंभार समाज या सर्वांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणारी नाही, असे मत सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.


समस्त नगरदेवळा ग्रामस्थांच्या वतीने परमेश्वर कै. गोरख बाप्पू यांच्या पुण्य आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement