Type Here to Get Search Results !

IAS दाम्पत्यात गंभीर वाद : छुपे कॅमेरे, हेरगिरी, हिंसाचाराचे आरोप

* IAS भारती दीक्षित यांच्या तक्रारीने राजस्थान प्रशासनात खळबळ

* पती IAS आशीष मोदीवर घरगुती हिंसाचार, ओलीस ठेवणे, पिस्तूल दाखवून धमकावणे आणि सरकारी साधनांचा गैरवापर केल्याचा आरोप केला

* जयपूरमध्ये तक्रार दाखल ; पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला 

जयपूर / प्रतिनिधी :- राजस्थानमध्ये कार्यरत असलेल्या IAS भारती दीक्षित यांनी आपल्या पतीवर आणि सहकारी IAS अधिकाऱ्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे प्रशासनात मोठी खळबळ माजली आहे. भारती दीक्षित सध्या वित्त विभागात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांचे पती IAS आशीष मोदी सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागात संचालक आहेत.

भारती दीक्षित यांनी 7 नोव्हेंबर रोजी जयपूरमधील एसएमएस पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत पतीवर घरगुती हिंसाचार, मारहाण, ओलीस ठेवणे, पिस्तूल दाखवून धमकावणे, अनैतिक संबंधांसाठी दबाव अशा धक्कादायक आरोपांची नोंद केली आहे.


* तक्रारीतील गंभीर आरोप - नेमके प्रकरण काय ? :- जबरदस्तीने लग्नाचा आरोप करीत भारती दीक्षित यांनी सांगितले की, 2014 मध्ये तिचे वडील कर्करोगाशी झुंजत असताना, भावनिक कमकुवतपणाचा फायदा घेत आशीष मोदी यांनी जबरदस्तीने लग्न केले. स्वतःबद्दल खोटी माहिती देऊन लग्नानंतर त्यांचे खरे वर्तन उघड झाले.


शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत असून पती दारूच्या नशेत वारंवार मारहाण करीत असतो, क्षुल्लक कारणांवरून हल्ले करीत असतो, गुन्हेगारांशी संबंध आहेत असा भारतींचा दावा आहे. 2018 मध्ये मुलगी जन्मल्यानंतर परिस्थिती अधिकच बिघडली, असेही त्यांनी सांगितले.


पिस्तूल दाखवून ओलीस ठेवण्याचा धक्कादायक आरोप करीत भारती दीक्षित यांनी तक्रारीत म्हटले की, ऑक्टोबर 2025 मध्ये पती आणि त्यांचा एक सहकारी यांनी तिला सरकारी गाडीत जबरदस्तीने नेले. पतीने बंदूक रोखून घटस्फोटासाठी जबरदस्ती केली. सहमत नसल्यास तुला आणि तुझ्या कुटुंबाला मारून टाकेन, अशी धमकी दिली.


खोलीत छुपा कॅमेरा, मोबाईल हॅकिंगचा आरोप आहे. भारती दीक्षित यांच्या आरोपानुसार पतीने खोलीत गुप्त कॅमेरे बसवले. मोबाईल हॅक करून गोपनीय सरकारी कागदपत्रे मिळवण्याचा प्रयत्न केला. सरकारी संसाधनांचा वैयक्तिक व गुन्हेगारी वापर केल्याचा आरोप असून सुरेंद्र विश्नोई आणि आशिष शर्मा या दोन सहकाऱ्यांची नावेही दिली आहेत.


जयपूर पोलिसांनी BNS (IPC) आणि IT कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपांची गांभीर्याने तपासणी सुरू केली आहे. लवकरच सर्व संबंधितांची चौकशी होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. भारती दीक्षित यांनी स्वतःसाठी व कुटुंबासाठी तात्काळ पोलिस संरक्षण मागितले असून पती व त्यांचे साथीदारांकडून जीवाला धोका असल्याचा आरोप केला आहे.


IAS दाम्पत्यातील हा वाद आता न्यायालयीन आणि पोलिस तपासाच्या चौकटीत जाईल. आरोप गंभीर असल्याने, प्रशासनात या प्रकरणामुळे मोठे पडसाद उमटले आहेत.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement