Type Here to Get Search Results !

पुण्यात विवाहाचे आमिष दाखवून तीन महिलांवर अत्याचार

* कोंढवा, हडपसर आणि सहकारनगरात स्वतंत्र गुन्हे दाखल

* अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार, दुसरी युवती गर्भवती

* तिसऱ्या महिलेलाही लग्नाचे आश्वासन देत फसवणूक - तिन्ही घटनांची पोलिसांकडून स्वतंत्र तपासणी

पुणे / प्रतिनिधी :- पुण्यात विवाहाच्या आमिषाने फसवून तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवती आणि एका महिलेवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकरणांमध्ये पीडितांनी तक्रारी दाखल केल्यानंतर कोंढवा, हडपसर आणि सहकारनगर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. दोन प्रकरणात आरोपीला अटकही करण्यात आली आहे.


* कोंढवा : अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार, आरोपी अटक :- कोंढवा पोलिसांनी विवाहाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. अनिकेत राकेश निकाळजे (वय 21, रा. एसआरए वसाहत, कमेला, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत युवतीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती अल्पवयीन आहे. आरोपी निकाळजे आणि युवतीची ओळख झाली होती. युवतीला विवाहाचे आमिष दाखवून त्याने जाळ्यात ओढले. त्यानंतर युवतीवर त्याने वेळोवेळी बलात्कार केला. युवतीने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याने युवतीला धमकावले. घाबरलेल्या युवतीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.



* हडपसर : लग्नाचे आमिष, बलात्कार ; युवती गर्भवती :- आणखी एक घटना हडपसर भागात घडली आहे. या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका युवतीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने युवतीला विवाहाचे आमिष दाखविले होते. त्याने तिच्यावर बलात्कार केला. युवती गर्भवती झाली. तिने विवाहाबाबत त्याच्याकडे विचारणा केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. युवतीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक हसीना शिकलगार तपास करीत आहेत.



* सहकारनगर : विवाहित महिलेलाही लग्नाचे आमिष, आरोपी अटक :- विवाहाच्या आमिषाने एका महिलेवर बलात्कार केल्याची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, रुपेश बाळू साळवे (वय 30, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याला अटक करण्यात आली. आरोपी साळवेने महिलेला विवाहाचे आमिष दाखविले होते. विवाहाच्या आमिषाने त्याने महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला. महिलेने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने नकार दिला. पोलिस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.


* विनयभंगाचे स्वतंत्र प्रकरण - येरवडा पोलिसांकडे गुन्हा नोंद :- महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या घरात युवक शिरला. महिलेला धमकावून त्याने अश्लील कृत्य केले. महिलेने त्याला विरोध केला. तेव्हा त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक दळवी तपास करीत आहेत.


सलग तीन बलात्काराच्या घटना व एक विनयभंग प्रकरण समोर आल्यानंतर पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सर्व प्रकरणांत पीडितांनी दिलेल्या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी गुन्हे नोंदवून तपास सुरू केला असून पुढील चौकशीसाठी आरोपींची माहिती गोळा केली जात आहे.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement