Type Here to Get Search Results !

रायगडमध्ये दुचाकींसाठी MH06-CV नवी मालिका सुरू

* RTO पेण कार्यालयाचा निर्णय ; आकर्षक नंबरसाठी 6 नोव्हेंबरपासून अर्ज प्रक्रिया - 7 नोव्हेंबरला लिलाव

नागोठणे / याकूब सय्यद :- रायगड जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेण येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन MH06-CV (सीव्ही) नोंदणी क्रमांक मालिका सुरू करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे. सदर मालिका सध्या उपलब्ध असलेल्या मालिकेतील नंबर जवळजवळ संपल्यामुळे लागू करण्यात आली आहे. आकर्षक आणि पसंतीचे नंबर मिळविण्यासाठी वाहनधारकांकडून मागणी वाढत असल्याने RTO कडून यासाठी विशेष वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.


* महत्त्वाच्या तारखा व प्रक्रिया :- आकर्षक नंबरसाठी अर्ज दाखल 6 नोव्हेंबर 2025 - सकाळी 10:30 ते दुपारी 1:30, आकर्षक नंबर अर्जांची यादी 6 नोव्हेंबर 2025 - दुपारी 2:30, लिलावासाठी बंद पाकीटात DD जमा करण्याची अंतिम वेळ 7 नोव्हेंबर 2025 - दुपारी 2:30, लिलाव (दुचाकी/चारचाकी) 7 नोव्हेंबर 2025 - दुपारी 3:30, (दुसरी लिलाव फेरी) 7 नोव्हेंबर 2025 - सायं. 4:30.


आकर्षक नंबरसाठी विहित शुल्काच्या 3 पट रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट (DD) अनिवार्य, अतिरिक्त बोलीची रक्कम किमान ₹ 501 पासून (त्यापेक्षा कमी रक्कम मान्य नाही), डिडी (DD) हा Dy. RTO Pen यांच्या नावाने राष्ट्रीयकृत / शेड्युल बँकेचा असावा, डिडी (DD) 2 महिन्यांपेक्षा जुना नसावा, अर्जासोबत ओळखपत्र, पत्ता पुरावा, पॅन (PAN), आधार कार्ड साक्षांकित प्रत अनिवार्य फक्त एकच सीलबंद पाकीट स्विकारले जाईल.


पसंतीचा नंबर राखून ठेवल्यानंतर 180 दिवसांच्या आत वाहन नोंदणी अनिवार्य, तसे न झाल्यास क्रमांक रद्द होईल आणि जमा रक्कम सरकारी तिजोरीत जाईल. एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास लिलाव प्रक्रिया होणार आहे. अर्जांची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर वेळेनुसार लावली जाईल. विहित शुल्कापेक्षा कमी डिडी (DD) स्विकारला जाणार नाही, आधी राखून ठेवलेला नंबर बदलता येणार नाही. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रायगड - पेण यांनी वाहनधारकांना नियमानुसार अर्ज करून आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयात हजर राहण्याचे आवाहन केले आहे.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement